पुणे : सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक करून त्याच्या विरोधात २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे..श्रीधर लिंबाजी कांबळे (वय ४६, रा. भीमनगर, थेऊर, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित सहा वर्षांची मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना आरोपीने तिला खाण्याचे आमिष दाखवून जवळ बोलावून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. लोणी काळभोर पोलिसांनी घटनेचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने आणि वेगाने केला. आरोपीला कठोर आणि जलद शिक्षा व्हावी या उद्देशाने पोलिसांनी २४ तासांत सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलिस निरीक्षक स्मिता पाटील, स्नेहल राजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, उपनिरीक्षक पूजा माळी, रूपाली जाधव आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.