

5 Acres Sugarcane Field Destroyed in Fire at Loni Kalbhor
Sakal
सुनील जगताप
थेऊर : येथील रायवाडी परिसरात तोडणीला आलेला ५ एकरापेक्षा अधिक क्षेत्रातील ऊसाला आग लागल्याची घटना घडली असल्याने यामध्ये ६ शेतकऱ्यांचे १० लाखांपेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटना मंगळवार (२३ डिसेंबर) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारांस घडली आहे. यामध्ये अशोक गेनबा गोते, गोविंद गोते, प्रभाकर अबू काळभोर, दत्तात्रय आबु काळभोर, भगवान लक्ष्मण काळभोर व सचिन भगवान काळभोर यांचे नुकसान झाले आहे.