Loni Kalbhor tenant verification lapse leads to FIR after drug seizure
Sakal
सुनील जगताप
थेऊर : लोणी काळभोर मध्ये भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला दिली नाही म्हणून घर मालकावर गुन्हा दाखल.नुकतेच लोणी काळभोर येथे गुन्हे शाखा,पुणे शहर पोलीस पथकाने येथील पाषाणकर बाग परिसरात अफसर अहेसान अंन्सारी (वय ३१,रा.पाषाणकर बाग,गॅस एजन्सी शेजारी लोणी काळभोर,ता हवेली,जि पुणे) याला ताब्यात घेऊन त्याचेकडून सुमारे १ लाख ८० हजार ९२० रुपये किंमतीचा ७ ग्रॅम ९९ मिलीग्रॅम (एम.डी.)अंमली पदार्थ जप्त केला होता.याप्रकरणातील आरोपी हा काळभोर हाइट्स या विमल रामदास काळभोर यांच्या मालकीच्या इमारतीत भाड्याने राहत होता त्याच्यासह अन्य १६ भाडेकरू देखील या इमारतीत भाड्याने राहतात,घरमालकाने या १७ भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला दिली नाही म्हणून लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.