दिलासादायक ! पुण्यातील "हा' भाग झाला अखेर कोरोनामुक्त 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

लोणीकंदमध्ये बरे झालेल्या तिसऱ्या रुग्णाचे स्वागत 

कोरेगाव भीमा : पुणे-नगर रस्त्यावर लोणीकंद (ता. हवेली) येथील कोरोना बाधित तिसरा रुग्ण यशस्वी उपचारानंतर ठणठणीत बरा होऊन आज सायंकाळी घरी परतला. त्यामुळे लोणीकंद गाव अखेर कोरोना मुक्त झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 
लोणीकंदमध्ये 21 एप्रिलला पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळला. त्याच्या संपर्कात आलेले आणखी दोन जणही 22 एप्रिलला खासगी लॅबमध्ये तपासणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्या तिघांनाही उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले. 

आणखी वाचा-पुण्यात दुकानं उघडली; पेट्रोल मिळू लागलं, आता वाहतूक कधी सुरू होणार?

दरम्यान, पहिला रुग्ण बरा होऊन सहा मे रोजी घरी परतला. तर काल दुसराही रुग्ण बरा होऊन घरी आला. तर कोरोनामुक्त झालेल्या तिसऱ्या रुग्णाचे आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद, सोमेश्वर महिला ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्षा पूजा कंद यांच्यासह ग्रामस्थांनी फुलांच्या वर्षावात स्वागत केले. 

आणखी वाचा-अतिवृष्टी, कोरोना अन्‌ आता "हे' नवं संकट....

यावेळी माजी सरपंच श्रीकांत कंद, पूजा प्रदीप कंद, सरपंच सागर गायकवाड, उपसरपंच योगेश झुरुंगे, रवींद्र कंद, रामदास ढगे, सोहम शिंदे, संतोष लोखंडे, संतोष झुरुंगे, विशाल कंद, माऊलीआबा कंद, गोपीनाथ कंद, गणेश बांदल, विष्णू खलसे उपस्थित होते. कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी काळजी घ्या, असे आवाहन कंद यांनी केले. 

आणखी वाचा-बारामतीहून पुण्याला जाणं होणार अधिक वेगवान

दरम्यानच्या काळात लोणीकंद ग्रामस्थांनी अतिशय काटेकोरपणे लॉकडाऊनचे पालन केल्याने 20 दिवसात एकही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. तर ग्रामस्थांनी गावात कोणालाही उपाशीही राहू दिले नाही. तीनही रुग्ण कोरोनातून पूर्ण बरे झाल्याने आता लोणीकंद गाव कोरोना मुक्त झाले असून ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

लोणीकंद करांनी जपला मदतीचा वसा... 
लोणीकंद गाव कोरोना मुक्त झाल्याचा मुहूर्त साधत व नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रदीपदादा कंद मित्रमंडळाच्या वतीने वढू बुद्रुक येथील माहेर संस्थेला दोन टन धान्य व भाजीपाला देण्यात आला. गरजेच्या वेळी मदत मिळाल्यामुळे माहेरमधील 250 निवासींना लाभ झाल्याने संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसि कुरियन व अध्यक्षा हिराबेगम मुल्ला यांनी कंद व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lonikand area is now corona free