आधी स्वतःच्या मतदारसंघातील रस्ते बघा : दीपक केसरकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आधी स्वतःच्या मतदारसंघातील रस्ते बघा : दीपक केसरकर

आधी स्वतःच्या मतदारसंघातील रस्ते बघा : दीपक केसरकर

sakal_logo
By
रुपेश हिराप

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : श्रेय लाटण्यासाठी बांदा-दोडामार्ग रस्त्याचे टेंडर मंजूर झाले असताना आणि सद्यस्थितीत खड्डे भरण्याचे काम सुरू असताना त्यावरुन आंदोलन करुन जनतेची दिशाभूल चुकीचे आहे; मात्र माझ्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्याची दुरावस्था पहावी, अशी टीका आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता आमदार दिपक केसरकर यांनी आज येथे केली.

टेंडर मिळूनही काम न करणाऱ्या ठेकेदारांचा आता फक्त ठेकाच रद्द केला तर पुढच्या वेळेला ब्लॅक लिस्टमध्ये टाकायला मागे हटणार नाही. त्यामुळे कामाचा दर्जा राखून काम करा, कोणाचेही लाड केले जाणार नाही, असा इशाराही श्री. केसरकर यांनी यावेळी दिला.

हेही वाचा: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' तारखेला पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम

येथील श्रीधर अपार्टमेंट या निवासस्थानी आमदार केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, "बांदा दोडामार्ग रस्त्याची टेंडर मंजूर झाले आहे. येणाऱ्या 22 नोव्हेंबरला ते ओपन करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत खड्डे भरण्याचे काम सुरु आहे; मात्र काम सुरू झाल्यानंतर त्यासाठी आंदोलन करणे चुकीचे आहे. म्हणजे निधी आम्ही आणायचा आणि श्रेय दुसऱ्याने घ्यायचे असाच प्रकार सुरू आहे. आज जिल्ह्यातील तीनही मतदार संघातील रस्त्याची परिस्थिती वाईट आहे. पूर्ण काळात या ठिकाणी नवीन न आल्याने ही परिस्थिती ओढवली; मात्र केवळ सावंतवाडी मतदारसंघातील रस्ते खराब आहेत असे भासविले जात आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या मतदार संघातील उणी करण्यापेक्षा स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या वाईट परिस्थितीकडे त्यांनी लक्ष द्यावे."

कणकवली मतदार संघातील रस्त्याची परिस्थिती ही अत्यंत वाईट असल्याचे सांगून या रस्त्यांचे फोटोही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवले.

loading image
go to top