गुन्हेगारांवर घरापासूनच नजर

अनिल सावळे
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

पुणे - सराईत गुन्हेगार घरातून केव्हा बाहेर पडतो, तो कुठे जातो, घरी कधी परततो, याचा रोजचा रोज अहवाल आता पोलिस तयार करणार आहेत. हे काम त्या-त्या भागातील बीट मार्शल करणार आहेत. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्र अवलंबले असून, त्यासाठी खास योजना तयार केली आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस आयुक्‍त के. वेंकटशेम यांनी ‘क्रिस्प क्रिमिनल इंटेनसिव्ह सर्व्हिलन्स प्रोजेक्‍ट’ राबविण्यास सुरवात केली आहे. यामुळे तीन महिन्यांत गुन्हेगारी काही प्रमाणात कमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

शहरात घरफोडी, सोनसाखळी हिसकावणे, वाहनचोरी आणि मारहाण यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. ते  रोखण्यासाठी पोलिसिंगला नव्या तंत्रज्ञानाची जोड देत ही योजना राबविण्यात येत आहे. नियंत्रण कक्षातून या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त समीर शेख हे योजनेचे समन्वयक असून, त्यांना आयटी अभियंता तौफीक सिद्दीकी यांच्याकडून तांत्रिक मदत मिळत आहे. शहरातील पाच परिमंडळांसाठी पाच अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

या योजनेंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्यांतील बीट मार्शलकडून गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. गुन्हेगारांच्या घरी जाऊन त्यांची माहिती घेणे, वॉरंट बजावणे, त्याचा फोटो आणि लोकेशन घेऊन ही माहिती नियंत्रण कक्षाला दररोज पाठविण्यात येते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा अहवाल तयार करून पोलिस आयुक्‍त, सहआयुक्‍त आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या व्हॉट्‌सॲप ग्रुपवर टाकण्यात येतो. जे गुन्हेगार बीट मार्शलला सापडत नाहीत, त्यांना शोधण्याचे काम पोलिस ठाण्यातील डीबीच्या पथकाला दिले जाते. डीबीच्याही हाती न लागल्यास वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून गुन्हेगारांना शोधण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगारांची पंचाईत झाली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे गुन्हेगारांना आता एखादा गुन्हा करताना दहा वेळा विचार करावा लागणार आहे.

गुन्हेगारी रोखण्यासाठी परंपरागत ‘सर्व्हिलन्स’ला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन हा प्रयोग राबविण्यात येत आहे. त्याचे परिणाम चांगले दिसून येत आहेत. गेल्या तीन महिन्यांत घरफोडी, जबरी चोरीसह काही गुन्ह्यांमध्ये १५ ते २८ टक्‍के घट झाली आहे. याचे श्रेय फिल्डवर काम करणाऱ्या बीट मार्शलांना द्यावे लागेल.
- के. वेंकटेशम, पोलिस आयुक्‍त

Web Title: Look at the criminals from the house