देशाचा राष्ट्रदेव गणपती असावा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

पुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव असला पाहिजे. देश धर्मनिरपेक्ष असला, तरीही त्याला राष्ट्रदेवाची आवश्‍यकता आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केले. 

पुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव असला पाहिजे. देश धर्मनिरपेक्ष असला, तरीही त्याला राष्ट्रदेवाची आवश्‍यकता आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केले. 

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटच्या वतीने आयोजित नवव्या भारतीय छात्र संसदेचे उद्‌घाटन शुक्रवारी झाले. यावेळी ओझा बोलत होते. याप्रसंगी राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश, सामाजिक कार्यकर्ते वल्लभ भन्साळी, आमदार राजेश टोपे, एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ कराड, युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल कराड आदी उपस्थित होते. यावेळी पश्‍चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांना "आदर्श विधानसभा अध्यक्ष' पुरस्काराने गौरविण्यात आले. 

"देशाच्या विकासासाठी चांगले नेतृत्व महत्त्वाचे असते. एखादा नेता देशाचे नेतृत्व करून देशाला प्रगतिपथावर नेऊ शकतो. तर एका नेत्याच्या चुकीमुळे आणि देशवासीय शांत राहिल्यामुळे देशावर गुलामगिरीचे वेळ येऊ शकते. म्हणूनच स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातील नवा भारत घडविण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातील तरुणांनी आवाज उठवायला हवा,'' असे मत हरिवंश यांनी यावेळी व्यक्त केले. टोपे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
 
हरिवंश म्हणाले : 
- मतांचे राजकारण करून नेते सत्ता टिकवितात; परंतु राजकारण देशाच्या हितासाठी हवे. 
- देशातील शिक्षणाची स्थिती दयनीय असून, यात नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. 
- सर्वांना रोजगार देण्यासाठी आर्थिक विकासाचे प्रारूप हवे 
- काळापैसा, गैरव्यवहार रोखण्यासाठी हवेत कडक कायदे 

''देशातील विविधता ही कमजोरी नसून, ताकद आहे, याची जाणीव तरुणांना झाली पाहिजे. खासदार, आमदार बनण्यासाठी नव्हे, तर नागरिकांची सेवा करण्यासाठी तरुणांनी राजकारणात आले पाहिजे. ''
- बिमान बॅनर्जी, अध्यक्ष, पश्‍चिम बंगाल, विधानसभा 

 

Web Title: lord ganesha should be National God of India