esakal | शेतकऱ्याने कसं जगायचं...११ किलो मिरची विकून मिळाले ७० रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

chilly.

कोरोना व लॉकडाउनचा गंभीर परिणाम शेती व्यवसायावर झालेला आहे. शेतमालाला चांगला दरही मिळत नाही. ११ किलो मिरचीला ७० रुपये मिळाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील उद्योजक शेतकऱ्याने ३२ एकरातील मिरची सोडून दिली आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

शेतकऱ्याने कसं जगायचं...११ किलो मिरची विकून मिळाले ७० रुपये

sakal_logo
By
राजकुमार थोरात

वालचंदनगर (पुणे) : कोरोना व लॉकडाउनचा गंभीर परिणाम शेती व्यवसायावर झालेला आहे. शेतमालाला चांगला दरही मिळत नाही. ११ किलो मिरचीला ७० रुपये मिळाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथील उद्योजक शेतकऱ्याने ३२ एकरातील मिरची सोडून दिली आहे. त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. मिरचीचा दर वाढले, या अपेक्षेने ठेवलेल्या चार एकरातील पक्व झालेल्या मिरच्याही आहेत तशाच सोडून दिल्या आहेत. मात्र, या फुकटच्या मिरचीसाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.

खडकवासला प्रकल्पात निम्म्याहून कमी साठा

कोरोना महामारीचा गंभीर परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे. शासानाने लॉकडाउन जाहिर केल्यामुळे मार्च, एप्रिल, मे महिन्यामध्ये उद्योगधंदे ठप्प झाले होते. तसेच, शेतकऱ्याने पिकवलेल्या शेतमालालाही दर मिळाले नाहीत. कवडीमोल किमतीने शेतकऱ्यांना शेतमाल विकावा लागला. जंक्शन येथे मुंबईमधील उद्योजकाने सुमारे २५० शेतजमीन करार पद्धतीने शेती महामंडळाकडून घेतली आहे. यातील सुमारे ३२ एकरामध्ये जानेवारी महिन्यामध्ये मिरचीची लागवड केली होती. एप्रिल महिन्याच्या सुरवातील मिरच्या उत्पादनास सुरवात झाली. लॉकडाउनमुळे दर मिळत नसल्याने व तोडणीचा खर्च परवडत शेतकऱ्याने मिरची शेतामध्ये गाडली. मिरचीला दर वाढेलेस या अपेक्षावर शेतकऱ्याने चार एकर मिरची राखून ठेवली होती. मात्र, याही मिरचीला दर मिळत नाही. त्यामुळे या उद्योजकाने चार एकर मिरची आहे तशीच सोडून दिली. शेतामधून फुकट मिरची मिळत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने परिसरातील नागरिकांची झुंबड उडाली होती. 

बारामतीत कोरोनाचा बारावा बळी

यासंदर्भात व्यवस्थापक अंबादास लाडंगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोरोनामुळे शेतमालाला दर मिळाला नाही. अकलुज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) मार्केटमध्ये ११ किलो मिरचीला ७० रुपये मिळाले. मिरचीची तोडणी करून बाजारपेठेमध्ये पाठवणे परवडत नव्हते. त्यामुळे मिरची शेतामध्ये सोडून देण्याची वेळ आली. लाखो रुपयांचे नुकसान झाले.