पाच नगरसेवकांचा कोथरूडमध्ये पराभव

ज्ञानेश्‍वर बिजले - @dbijale_sakal  
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

कोथरूड क्षेत्रीय कार्यालयांतर्गतच्या तीन प्रभागांत महापालिकेचे सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे गटनेते किशोर शिंदे यांच्यासह पाच नगरसेवकांचा पराभव करीत बारापैकी आठ जागा भाजपच्या उमेदवारांनी जिंकल्या. भाजपची लाट या परिसरात दिसून आली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर, शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे नगरसेवक चंदू कदम आणि नगरसेविका वैशाली मराठे यांनी त्यांच्या जागा राखल्या. भाजपचे माजी नगरसेवक मुरलीधर मोहोळ, तसेच हर्षाली माथवड, वासंती जाधव, डॉ. श्रद्धा प्रभुणे, अल्पना वरपे, दिलीप वेडे पाटील, किरण वेडे पाटील आणि छाया मारणे हे निवडून आले.

शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोथरूडमधील प्रभाग क्रमांक १२ (मयूर कॉलनी- डहाणूकर कॉलनी) मध्ये भाजपच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत तीन जागा जिंकल्या. शिवसेनेचे नगरसेवक सुतार यांना ७९६ मतांनी विजय मिळविता आला. भाजपचे उमेदवार ॲड. मिहीर प्रभुदेसाई यांनी त्यांना जोरदार लढत दिली. सुतार यांनी पहिल्या दोन फेरीत मिळविलेली आघाडी तिसऱ्या फेरीत प्रभुदेसाई यांनी एक हजार मतांनी कमी केली. पुढील दोन फेऱ्यांत सुतार यांनी घेतलेली अडीच हजार मतांची आघाडी शेवटच्या दोन फेऱ्यांत प्रभुदेसाई यांनी सुमारे दोन हजार मतांनी कमी केली. शेवटी सुतार विजयी झाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लक्षवेधी लढत ठरलेल्या प्रभाग क्रमांक १२ मध्ये प्रचार सभा घेतल्या. मोहोळ आणि शिवसेनेचे श्‍याम देशपांडे यांच्यातही अटीतटीची लढत होईल, अशी अपेक्षा होती. तेथे एका फेरीचा अपवाद वगळता सहा फेऱ्यांमध्ये मोहोळ यांनी आघाडी घेत सहा हजार ८७९ मताधिक्‍यांनी विजय मिळविला. 

प्रभाग क्रमांक ११ (रामबाग कॉलनी-शिवतीर्थनगर) मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे चार नगरसेवक विजयी होतील, अशी चर्चा होती. मात्र, लगतच्या परिसरातील भाजपची लाट या भागातही जाणवली. तेथे ब गटात भाजपच्या छाया मारणे यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्‍विनी जाधव यांचा बाराशे मतांनी पराभव केला. ‘अ’ गटात राष्ट्रवादीचे दीपक मानकर तीन हजार ७८९ मताधिक्‍यांनी, ‘क’ गटात काँग्रेसच्या वैशाली मराठे एक हजार ६७ मताधिक्‍यांनी आणि ‘ड’ गटात काँग्रेसचे नगरसेवक चंदू कदम सहा हजार ५५७ मताधिक्‍यांनी विजयी झाले.

प्रभाग क्रमांक दहामध्ये राष्ट्रवादीचे सभागृह नेते बंडू केमसे, मनसेचे महापालिकेतील गटनेते किशोर शिंदे, नगरसेविका जयश्री मारणे, नगरसेविका पुष्पा कनोजिया यांचा पराभव करीत भाजपचे चार उमेदवार विजयी झाले. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत या चौघांनी प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी घेत विजय मिळविला. ‘‘आम्ही एकत्रितपणे प्रचार करीत पक्षाच्या उमेदवारांना मते मागितली. पक्षाने केलेली विकासकामे सांगितली. त्याचा आम्हाला फायदा झाला,’’ असे विजयी उमेदवारांनी सांगितले. ‘अ’ गटात किरण दगडे पाटील सात हजार २४१ मताधिक्‍यांनी, ‘ब’ गटात डॉ. श्रद्धा प्रभुणे दहा हजार ८५४ मताधिक्‍क्‍यांनी, ‘क’ गटात अल्पना वरपे ११ हजार २३३ मताधिक्‍क्‍यांनी, आणि ‘ड’ गटात दिलीप वेडे पाटील १२ हजार ५३० मताधिक्‍क्‍यांनी विजयी झाले.

Web Title: Loss of five corporator in Pune