पुणे : हरवलेली कागदपत्रे मिळाली; पण, आता जे काही होत आहे ते...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

तीन वर्षापूर्वी मुलीची हरविलेली महत्त्वाची कागदपत्रे सोशल मीडियाद्वारे भोसरीतील दिघी रस्त्यावरील राधानगरीत राहणारे शिवाजी गायकवाड यांना पुन्हा मिळाली. मात्र, कागदपत्रे हरवल्याचा हा मेसेज कोणीतरी त्रयस्ताने चुकीच्या नावानिशी सोशल मिडियावर पुन्हा व्हायरल केला. गायकवाड यांना हा मेसेज सांगण्यासाठी डिसेंबर महिन्यांपासून येत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या गायकवाड यांनी इमारतीखाली कागदपत्रे मिळाल्याचा फलक लावला आहे. त्या फलकाखालीच दिवसभर ते ठाण मांडून बसतात आणि आलेल्या नागरिकांना भेटतात.

भोसरी (पुणे) : तीन वर्षापूर्वी मुलीची हरविलेली महत्त्वाची कागदपत्रे सोशल मीडियाद्वारे भोसरीतील दिघी रस्त्यावरील राधानगरीत राहणारे शिवाजी गायकवाड यांना पुन्हा मिळाली. मात्र, कागदपत्रे हरवल्याचा हा मेसेज कोणीतरी त्रयस्ताने चुकीच्या नावानिशी सोशल मिडियावर पुन्हा व्हायरल केला. गायकवाड यांना हा मेसेज सांगण्यासाठी डिसेंबर महिन्यांपासून येत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या गायकवाड यांनी इमारतीखाली कागदपत्रे मिळाल्याचा फलक लावला आहे. त्या फलकाखालीच दिवसभर ते ठाण मांडून बसतात आणि आलेल्या नागरिकांना भेटतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यभरातूनही त्यांचे नातेवाईक, मित्र दूरध्वनीवरून संपर्क साधून गायकवाड यांना माहिती देत आहेत. सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या मेसेजबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला आहे. २०१६ साली गायकवाड यांची मुलगी रिक्षातून प्रवास करत असताना त्यांची पॅन कार्ड, बॅंकेचे एटीएम कार्ड, वाहन चालक परवाना, आधारकार्ड आदी महात्त्वाची कागदपत्रे  असलेली पिशवी हरविली. ही रिक्षा पिंपळे-गुरवमधील वाशिंग सेंटरमध्ये धुण्यासाठी आल्यानंतर कर्मचाऱ्याने ती पिशवी अडगळीत टाकली. डिसेंबर २०१९ मध्ये पिंपळेगुरवमधील ट्रॅव्हल कंपनीचे मालक देवानंद कांबळे यांच्या निदर्शनास ती पिशवी आली. कळकटलेल्या अवस्थेतील ही कागदपत्रे कांबळे यांनी स्वच्छ करवून घेतली. त्याचप्रमाणे त्यांचा फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल केला.

कोरोनाला घाबरू नका; अशा प्रकारे घ्या काळजी

दोन दिवसांनी मात्र कांबळे यांना गायकवाड यांचा पत्ता मिळाल्यावर त्यांनी स्वतःच जाऊन गायकवाड यांना ती कागदपत्रे सुपूर्त केली. मात्र, त्रयस्थ माणसाने सोशल मीडियावरील कागदपत्राच्या फोटोबरोबर चुकीचे नाव व स्वारगेट बस डेपोचा पत्ता टाकत ही पोस्ट पुन्हा व्हायरल केली. ही पोस्ट राज्यभर व्हायरल झाल्याने गायकवाड यांना सोलापूर, रत्नागिरी, कऱ्हाड, कोल्हापूर, आंबेगाव, मंचर आदी भागातून त्यांच्या हरवलेल्या कागदपत्रांचा पत्ता सांगण्यासाठी त्यांचे मित्र, नातेवाईक दूरध्वनीवरून संपर्क साधत आहेत. त्याचप्रमाणे भोसरीतील जवळपास सर्वच ग्रूपवर हा मेसेज व्हायरल होत असल्याने दररोज नागरिक त्यांच्या कागदपत्रांचा पत्ता सांगण्यासाठी भेट देतात.

कोरेगाव पार्कचे नाव राहणार कायम; 'हे' नाव करण्याचा होता प्रस्ताव

सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत नागरिक भेट देत असल्याने गायकवाड कुटुंबिय त्रासून गेले. त्यामुळे गायकवाड यांनी  इमारतीखालीच कागदपत्रे सापडल्याचा फलक लिहून त्या फलकाखालीच ठिय्या मारला आहे. त्याचप्रमाणे नागरिकांना कागदपत्रे भेटल्याचे सांगत आहेत. कांबळे यांचा ट्रॅव्हलचा व्यवसाय आहे. ग्राहकांच्यादू रध्वनीबरोबरच कागदपत्रांविषयी त्यांनाही दूरध्वनीवरून आजही विचारले जात असल्याने तेही त्रस्त झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lost documents were recovered Shivaji Gaikwad Bhosari Pune