'ती' सापडली अन् आई वडिलांनी सोडला सुटकेचा निःश्वास!

राजेंद्रकृष्ण कापसे
मंगळवार, 21 जानेवारी 2020

नाकाबंदी, मार्शल पोलीस शोध घेत होते. अखेर चार तासांनी मुलगी सुरक्षित सापडल्याने पालक व वारजे माळवाडी पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. 

वारजे माळवाडी (पुणे) : येथील पोलिस ठाण्यात रविवारी संध्याकाळी आठ वर्षांची मुलगी हरवल्याची तक्रार तिच्या आई- वडिलांनी केली. अन् काही क्षणात वर्णनाप्रमाणे मुलीचा शोध सुरू झाला. नाकाबंदी, मार्शल पोलीस शोध घेत होते. अखेर चार तासांनी मुलगी सुरक्षित सापडल्याने पालक व वारजे माळवाडी पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. 

दाभोलकर हत्या : आरोपी विक्रम भावेच्या जामिनावर आज निकाल 

पोलिसांच्या माहितीनुसार, हद्दीतील डोंगरालगतच्या वस्तीतील पालक आठ वर्षाची मुलगी हरविली. अशी तक्रार घेऊन पोलिस ठाण्यात पोचले. ते दोघे ही मजुरी करतात. त्यामुळे, सकाळी नऊ वाजता मुलीला घरी ठेऊन ते कामाला गेले होते. संध्याकाळी घरी आल्यावर मुलगी न दिसल्याने तिचा शोध घेतला. ती न सापडल्याने त्यांनी थेट पोलिस ठाण्यात गाठले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून डुक्कर खिंडीत नाकाबंदी केली. मार्शल मुलीचा शोध घेत होते. अखेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तेवढ्यात मार्शल यांना वस्तीकडे येणाऱ्या रिक्षात ती मुलगी कुटुंबात सोबत होती. तिला तिच्या आई- वडिलांच्या ताब्यात दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याचे झाले असे की, पालक कामाला गेल्यावर ती मुलगी रविवारी सुट्टी असल्याने वर्ग मैत्रिणीकडे गेली. मैत्रीण तिच्या आई वडिलांसोबत यात्रेला जाणार होती. ही मुलगी म्हणाली मला पण तुमच्याबरोबर यात्रेला यायचे आहे. ती घरी येऊन आवरून मैत्रिणीच्या कुटुंबासोबत रिक्षातून कोणाला न सांगता यात्रेला गेली. परंतु रिक्षा चालकाने त्या मुलीच्या पालकांची परवानगी घेतली नव्हती. 

मुलीची मैत्रीण असल्याने ते कुटुंब तिला बरोबर घेऊन गेले. आणि रात्री उशिरा येताना रिक्षात ती पोलिसांना सापडली. अखेर त्या रिक्षा चालकाने तिला यात्रेत बांगड्या आणि खाऊ देखील तिला दिला होता. दरम्यान, दोघींचे पालक एकमेकांना ओळखत नव्हते. त्यामुळे ती कोणाबरोबर गेली ही माहिती नव्हती. त्यामुळे तिचे पालक पोलिस ठाण्यात पोचले होते. मुलीला पाहताच पालक आणि पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला. वारजे माळवाडी पोलिसांनी तातडीने घेतलेली भूमिका, केलेली धावपळ सुमारे 50हुन अधिक कर्मचारी यंत्रणा काम करीत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lost girl found at Warje Pune