अन् चिमुकली आईच्या कुशीत

PNE18O84575.jpg
PNE18O84575.jpg

पुणे : वाट चुकलेल्या दोन वर्षांच्या मुलीला वारजे पोलिसांच्या कार्यतत्परतेने अवघ्या दोन तासांत आईच्या कुशीत विसावा मिळाला.

गणपती माथ्यालगत असणाऱ्या रस्त्यावर दोन वर्षांची सोनम रडत होती. नागरिकांनी तिला वारजे पोलिसांच्या स्वाधिन केले. तिला मम्मा सोडून काही बोलता येत नव्हते. त्यामुळे तिचा पत्ता व तिच्या आई-वडिलांना शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

पोलिसांनी तिची अधिक चौकशी करून तिचा फोटो वारजे भागातील सर्व व्हॉट्‌सऍप ग्रुपवर शेअर केला आणि अवघ्या दोन तासांतच या मुलीला तिची आई मिळाली. पोलिसांनी कार्यतत्परता दाखवल्याने या चिमुकलीच्या नातेवाइकांचा शोध घेण्यात यश आले. याकामी वारजे पोलिस ठाण्याचे संतोष भापकर, सोनवणे व इतर पोलिसांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत त्या चिमुकलीला आई संगीता कुंडलिक खवले यांच्या ताब्यात दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com