MPSC च्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संतापले; राजकीय नेत्यांना केलं लक्ष्य!

महेश जगताप
Wednesday, 26 August 2020

​विद्यार्थ्यांची तयारी असताना काही राजकीय नेते आणि स्वयंघोषित प्रतिनिधी विनाकारण या परीक्षांमध्ये अडथळा ठरत आहेत.

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले आहेत. आमची बरीच वर्ष यामध्ये गेली आहेत. अजून किती वर्ष कोविडच्या नावावर तुम्ही घालवणार आहात, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी राज्य सरकारला विचारला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग हे परीक्षांबाबत निर्णय घेते की राजकीय नेते? राजकीय नेतेच आमचं भविष्य ठरवायला लागले आहेत, असं मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केलं.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आगामी काळात होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच ट्विटरवरून दिली. या परीक्षा सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये होणार होत्या, पण राज्यामध्ये कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे कारण देण्यात आले आहे.

'जम्बो सेंटर'नंतर आता पश्‍चिम पुण्यासाठी नवं कोरोना हॉस्पिटल; महापौरांनी दिली माहिती​

प्रत्येक संघटना, राजकीय नेते, स्वयंघोषित प्रतिनिधी त्यांच्या सोयीनुसार भूमिका घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच काही संघटनांनी, राजकीय नेत्यांनी मागणी केली होती की, परीक्षा घेण्यात याव्या आणि तेच लोक आज परीक्षा पुढे ढकला म्हणून मागणी करत आहेत. त्याचबरोबर परीक्षेसाठी देण्यात आलेले सेंटर बदलण्याची परवानगी आयोगाने द्यावी, अशी मागणी अनेकांनी केली होती. 

मात्र, पुण्यामध्ये चाळीस हजार सीट्स परीक्षेसाठी उपलब्ध असताना यापैकी बत्तीस हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी पुण्यालाच पसंती दिली आहे. एवढा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असताना परीक्षा पुढे ढकलण्याचा घाट सरकारने का घातला आहे, ते कळत नाही. वेळोवेळी परीक्षा संदर्भात निर्णय बदलून आमच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे, असे मत अमोल पाटील या विद्यार्थ्याने 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

वडिलोपार्जित मालमत्ता एकट्याला हवी आहे, तर...

विद्यार्थ्यांची तयारी असताना काही राजकीय नेते आणि स्वयंघोषित प्रतिनिधी विनाकारण या परीक्षांमध्ये अडथळा ठरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करण्याचे काम हे लोक करत आहेत, असे मत योगेश बाबर या विद्यार्थ्याने व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lot of anger among the students after postponed MPSC exams