मेहनती विद्यार्थ्यांना करिअरचे अनेक पर्याय- प्रा.वेलणकर

रमेश मोरे
सोमवार, 2 जुलै 2018

जुनी सांगवी : (पुणे) प्रत्येक क्षेत्रात आपल्याला संधी मिळते. त्याचा शोध घेवून आवडते क्षेत्र निवडावे. निवडलेल्या  आवडीच्या क्षेत्रामध्ये करियर करावे, त्यातून हमखास यश मिळेल असे मत सजग नागरी मंचचे संस्थापक अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी जुनी सांगवी येथे राहिमाई महिला प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थी मेळावा व सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.

ते म्हणाले, मेहनती विद्यार्थ्यांना मी काय करू असा प्रश्न कधीच पडत नाहीत. कष्टाळु मुले कुठल्याही क्षेत्रातील संधीच सोनं करतात.योग्य नियोजन केल्यास प्रत्येक क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे. कार्यक्रमास आमदार लक्ष्मण जगताप,  नगरसेविका माई ढोरे, शारदा सोनवणे, हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सिनेट सदस्य संतोष ढोरे, नितीन खोडदे, शिवलींग किणगे, नाना कड, गणेश काची, मनोहर ढोरे आदि मान्यवर उपस्थित होते.यावेळी अडीचशे मुलांचा प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.बारावीतील श्रध्दा जठार ९२.४६ टक्के, दहावीतील आदिती मोजिद्रा ९७.६० टक्के, राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कास्य पदक विजेती रमणसिंग सिंधू यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दहावी-बारावीतील परिसरातील  गुणवंत विद्यार्थांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नामदेव तळपे यांनी केले. तर जवाहर ढोरे यांनी आभार मानले.

Web Title: lots of option for career to students said welankar