पारगाव : गावतळ्यात कडक उन्हाळ्यातही मुबलक पाणीसाठा

सुदाम बिडकर
शनिवार, 26 मे 2018

पारगाव - शिरदाळे ता. आंबेगाव येथील गावालगत असलेल्या नैसर्गीक तळ्यात कडक उन्हाळ्यातही मुबलक पाणी साठा आहे. त्यामुळे गावातील लहान मुले, तरुण आणि महिला बिनधास्तपणे या तळ्यात पोहण्याचा आनंद लूटत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

पारगाव - शिरदाळे ता. आंबेगाव येथील गावालगत असलेल्या नैसर्गीक तळ्यात कडक उन्हाळ्यातही मुबलक पाणी साठा आहे. त्यामुळे गावातील लहान मुले, तरुण आणि महिला बिनधास्तपणे या तळ्यात पोहण्याचा आनंद लूटत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

तालुक्याच्या पुर्वभागात दुष्काळी भाग म्हणुन ओळख असलेल्या लोणी-धामणी परिसरातील शिरदाळे गाव हे उंच डोंगरावर वसलेले आहे. गाव दुष्काळी असले तरी गावालगत असलेले पाण्याचे तळे या गावाला मिळालेली नैसर्गिक देनगी आहे. परिसरात कीतीही दुष्काळ असला तरी या तळ्यातील पाणी कधीही आटत नाही संपुर्ण वर्षभर या तळ्यातील पाणी असते. हे तळे परिसरातील नागरिक व जनावरांची तहान भागवत असते. काही वर्षापुर्वी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व शरद सहकारी बँक यांच्या माध्यमातून या तळ्याचे खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

जस जसा उन्हाळा सुरु होईल तसे गावातील लहान मुले तरुण आणि महिला बिनधास्त या तळ्यात पोहण्याचा आनंद लूटत असल्याचे पहायला मिळत आहे. आजही कडक उन्हाळा असताना परिसरातील सर्व नैसर्गीक पाणी साठ्यातील पाणी आटले असले तरी या तळ्याच्या मध्यभागी 3 ते 4 परस खोल पाणी साठा असल्याचे स्थानिक तरुण मयूर सरडे यांनी सांगितले.

दररोज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परिसरातील ग्रामस्थ पोहण्यासाठी या तलावात येतात दुपारी तीन वाजे पर्यंत पोहणार्यांमुळे संपूर्ण तळे गजबजलेले असते. कधी कधी तर आसपासच्या चिंचबाई वाडी ,बोऱ्हाडेमळा, धामणी व पहाडदरा गावातील तरुण या तळ्यात पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. रस्त्याने येणारे जाणारे लोक हे चित्र पाहुन सुखावतात.

Web Title: Lots of water lake in the summer