लॉटरी बहाद्दारांची लॉकडाऊनमध्ये 'अशी' लागली 'लॉटरी'

Since the lottery is closed the money spent on it is used for daily needs by lottery ticket buyers
Since the lottery is closed the money spent on it is used for daily needs by lottery ticket buyers
Updated on

पुणे : तिकीट खरेदी करून किंवा ऑनलाइन पध्दतीने लाखो-कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागेल या भाबड्या आशेतून दररोज लॉटरीसाठी पैसे खर्च करणाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना लॉकडाऊन काही अंशी दिलासा देणारा ठरला आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून लॉटरी बंद असल्याने त्यावर खर्च होणारा बराचसा पैसा सध्या घरखर्चासाठी वापरला जात आहे. दैनंदिन गरजा भागत असल्याने लॉटरी बहादरांच्या पत्नीच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितली आरोग्यासाठी पंचसूत्री; वाचा सविस्तर

लॉटरीवर नशिब आजमावऱ्यांची संख्या शहरातला हजारोंच्या घरात आहे. विविध प्रकारच्या लॉटरीची तिकीट विक्री किंवा ऑनलाईन लॉटरीचा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या तीनशेच्या घरात आहे. कोरोनामुळे या व्यवसायिकांची कमाई बंद झाली आहे. मात्र लॉटरीचे जणू व्यसनच लागलेल्या आणि त्यातून कुटुंबाची हेळसांड केलेल्या अनेकांचे नशिबाच्या भरवशावर वाया जाणारे पैसे मात्र बचावत आहेत नको. पैसे लावून त्यातून काहीच हाती आले नाही म्हणून होणारा पश्चाताप, चिडचिड आणि इतर धोकादायक बाबींना देखील या काळात ब्रेक लागला आहे. या सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे लॉटरीवर खर्च होणारा बराचसा पैसा हा आता घरात काय हवे-नको यासाठी वापरला जात आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  
याबाबत घोरपडी येथे राहणाऱ्या एका महिलेने सांगितले की, माझे पती विविध कामांमधून महिन्याला 10 हजार रुपये कमावतात. अनेक वर्षांपासून ते लॉटरी खेळत आहेत. त्यातून त्यांना काही वेळा पैसे मिळाले. मात्र आजपर्यंत त्यांनी खर्च केलेल्या पैशांचा विचार करता ती रक्कम काहीच नाही. लॉटरीवर पैसे खर्च न करण्याची वारंवार विनंती करूनही ते आमचं ऐकत नाही. त्यामुळे कधी कधी तर किराणा आणण्यासाठी देखील पैसे नसतात. मात्र अडीच महिन्यांपासून हे चित्र बदलले आहे. ते आता घरासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे देत आहे.
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com