प्रेमविवाहानंतर दांपत्य सहा महिन्यांतच वेगळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

प्रेमविवाहानंतर अवघ्या सहा महिन्यांतच वैचारिक मतभेदामुळे वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दांपत्याने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा न्यायालयाने मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे न्यायालयाने अवघ्या ११ दिवसांत त्यांचा अर्ज निकाली काढला.

पुणे - प्रेमविवाहानंतर अवघ्या सहा महिन्यांतच वैचारिक मतभेदामुळे वेगळे राहणाऱ्या उच्चशिक्षित दांपत्याने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा न्यायालयाने मंजूर केला. कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश सुभाष काफरे यांनी हा निकाल दिला. विशेष म्हणजे न्यायालयाने अवघ्या ११ दिवसांत त्यांचा अर्ज निकाली काढला.  

नेहा आणि अजय (नावे बदललेली आहेत) अशी त्याचे नावे. त्यांनी ॲड. केतन परदेशी, ॲड. सईद शेख आणि ॲड. योगेश शिंदे यांच्यामार्फत दावा दाखल केला होता. अजयचा व्यवसाय आहे. त्यांचा १६ जानेवारी २०१७ रोजी आंतरजातीय प्रेमविवाह झाला. मात्र, आवडीनिवडी, मतभिन्नतेमुळे त्यांच्यात काही दिवसांतच वाद होऊ लागले. त्यामुळे घरातील वरिष्ठ मंडळींनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण वाद विकोपाला गेल्यानंतर नेहा ६ जुलै २०१७ रोजी निघून गेली. त्यानंतरही त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, ते पुन्हा एकत्र येईना. अखेर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला. तिने पोटगीचा अधिकार सोडला. दोघांच्या कुटुंबीयांनी एकमेकांची बदनामी, मानहानी होईल, असे कृत्य करायचे नाही. एकमेकांविरोधात अथवा नातेवाइकांच्या विरोधात दिवाणी, फौजदारी न्यायालयात दावे दाखल करायचे नाही. पोलिसांत तक्रारी दाखल न करण्याच्या अटी दोघांनी मान्य केल्या व विभक्त झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love Marriage Divorce Family Court