पुणे शहरात नीचांकी तापमान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढू लागल्याने राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी आता जाणवू लागली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये शुक्रवारी ११.८ अंश सेल्सिअस अशा नीचांकी तापमानाची नोंद झाली. पुण्यात तब्बल दोन अंश सेल्सिअसने तापमानात घट झाल्याचे दिसून आले. 

बंगालच्या उपसागरातील ‘गज’ चक्रीवादळ शुक्रवारी तमिळनाडूच्या पश्‍चिमेकडे घोंगावत आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असून, ते अरबी समुद्राकडे सरकण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट, तर कोकण-गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किंचित घट झाल्याचे निदर्शनास आले. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान शनिवारी (ता. १७) कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. तर कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात रविवार (ता. १८) ते मंगळवार (ता. २०) दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाल्याचे दिसून आले. जळगाव (१२), सांगली (१४.२) आणि सातारा (१४.४) येथे १५ अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदविले गेले.

Web Title: Low temperature in Pune city