Vidhan Sabha 2019 : पुण्यात भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून बंडखोरी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील अन्य इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरी घोषित करण्यात आली. सर्वांचेच पत्ते कापून, भाजपने दिलीप कांबळे यांचे बंधू स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेल्यांनी उघड बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. 

पुणे (कॅन्टोन्मेंट) : पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी दिल्याने पक्षातील अन्य इच्छुक उमेदवारांकडून बंडखोरी घोषित करण्यात आली. सर्वांचेच पत्ते कापून, भाजपने दिलीप कांबळे यांचे बंधू स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे या मतदारसंघातून इच्छुक असलेल्यांनी उघड बंडखोरीचा पवित्रा घेतला आहे. 

सुनील कांबळे  यांनी मुलाखत न देता केवळ आर्थिक निकषावर ही उमेदवारी दिल्याचा आरोप माजी नगरसेवक बापूसाहेब कांबळे यांनी केला आहे. यामतदार संघात विद्यमान आमदार दिलीप कांबळे आहे. उमेदवारी मिळण्यासाठी ते मतदारसंघात दावेदार होते. मात्र, एका फसवणुकीच्या प्रकरणात दिलीप कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे मंत्रिपदही काढून घेण्यात आले. त्यामुळे त्यांचे तिकीट कापल्याची चर्चा मतदारसंघात आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही संपवायची असा निर्धार केलेला असतानादेखिल यामतदार संघात सुनील कांबळे यांना घराणेशाही असताना तिकीट देऊन पंतप्रधानांचे शब्द डावलले जात असल्याचे देखील बापूसाहेब यांचे म्हणणे आहे. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला उमेदवाराला पक्षाने तिकीट देऊन भाजप शिस्तबद्ध पक्षाला शिस्तीला धक्का दिला आहे असेही ते म्हणाले. 

21 इच्छुक उमेदवारांनी मिळून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता व पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष डॉ. भरत वैरागे यांना पक्षाचा बंडखोर उमेदवार म्हणून निवडून आणण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यावेळी पक्षश्रेष्ठीनी कार्यकर्त्यांचा कुठलाही विचार न घेता परस्पर निर्णय घेतल्याने हा उद्रेक झाला आहे. त्यामुळे हा उद्रेक क्षमण्याची शक्यता नसल्याने यामतदार भाजपच्या अधिकृत उमेदवाराची मतांची विभाजणी होणार आहे.

गेले अनेक वर्ष मातंग समाजाचे प्रतिनिधी या मतदारसंघात प्रतिनिधित्व करत होते. सध्यस्थितीत राजकीय परिस्थितीचा विचार करता विविध संघटनांनी डॉ भरत वैरागे यांना एकमुखी सक्रिय पाठिंबा दर्शविला आहे. शुक्रवारी सकाळी 10 वाजता वैरागे हे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या ताफ्याने शक्तिप्रदर्शन करून आपले नामांकन पत्र दाखल करणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: loyalists partyworkers in Pune are oppose sunil kamble