Indian Army : ले. कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांनी पुतीन यांना दिली मानवंदना; निमगाव म्हाळुंगीचा अभिमान!

Rashtrapati Bhavan : ले. कर्नल हर्षवर्धन ढेकणे यांनी राष्ट्रपती भवनात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मानवंदना देत पुणे जिल्ह्याचा मान वाढवला. निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांनी या गौरवक्षणाचा अभिमानाने आनंद व्यक्त केला.
Lt Colonel Harshavardhan Dhekne from Pune district presents Guard of Honour to Russian President Vladimir Putin

Lt Colonel Harshavardhan Dhekne from Pune district presents Guard of Honour to Russian President Vladimir Putin

Sakal

Updated on

तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगी (ता.शिरूर) येथील लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन शहाजी ढेकणे यांनी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे भारत दौऱ्यावर आलेल्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भारतीय सैन्य दलातर्फे मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) दिली. ही बातमी सोशल मीडियावर पाहताच पुणे जिल्ह्यासह निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. कोणत्याही देशाचे राष्ट्राध्यक्ष किंवा महत्त्वाची व्यक्ती भारत दौऱ्यावर आल्यानंतर लष्करातर्फे "गार्ड ऑफ ऑनर"देण्याची प्रथा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com