Pune Crime : विवाहाच्या आमिषाने बलात्कार; लष्करी अधिकाऱ्यावर गुन्हा

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्यासह त्याच्या आईसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime news
Crime news esakal

पुणे - विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका लष्करी अधिकाऱ्यासह त्याच्या आईसह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने याबाबत हरियाना पोलिसांकडे नुकतीच तक्रार दिली. तेथून हा गुन्हा पुणे पोलिसांकडे तपासासाठी सोपविण्यात आला.

याप्रकरणी मेजर परिमलकुमार (रा. प्रिन्स ऑफ वेल्स रोड, वानवडी) यांच्यासह आई आणि एका नातेवाईकाविरुद्ध लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी मूळची हरियानामधील आहे. तिने विवाहविषयक संकेतस्थळावर नोंदणी केली होती. ती माहिती वाचून मेजर परिमलकुमार यांच्या आईने तरुणीशी संपर्क साधला आणि विवाहाबाबत विचारणा केली.

मुलगा परिमलकुमार लष्करात मेजर असून, पुण्यात नियुक्तीस असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर परिमलकुमार यांची आई आणि नातेवाईक हरियानात मुलीच्या घरी गेले. तिच्या कुटुंबीयांशी विवाहाबाबत बोलणी केली. त्यानंतर तरुणी आणि परिमलकुमार यांच्यात संपर्क वाढला.

तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा सध्या सुटी नसल्याचे त्यांनी तरुणीला सांगितले. त्यानंतर तरुणी पुण्यात आली. तेव्हा घरी नातेवाईक आले आहेत, असे सांगून तरुणीची लष्कर भागातील एका तारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली. तेथे परिमलकुमार यांनी तिच्याशी बळजबरी करून बलात्कार केला. तेव्हा आपण लवकरच विवाह करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर तरुणीला खंडाळा परिसरात फिरायला नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा लवकरच दिल्लीत विवाह करू, अशी बतावणी केली. त्यानंतर परिमलकुमार, त्यांची आई, नातेवाइकांनी तरुणीशी संपर्क तोडला. तिने दूरध्वनी केल्यानंतर प्रतिसाद दिला नाही. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी तिला धमकावले.

आमची दिल्लीतील मोठ्या नेत्यांशी ओळख आहे. आमच्याविरुद्ध तक्रार केली तर, तुझे कुटुंबीय अडचणीत येतील, अशी धमकी दिली. त्यामुळे तरुणीने नुकतीच हरियानातील फरिदाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिस उपनिरीक्षक मनीषा वळसे या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com