पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध केली तक्रार; महिलेकडे 50 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी

माहिती अधिकार कार्यकर्ता सुनील आल्हाट यास गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक; चौघाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Crime
Crime sakal media

पुणे : पोलिस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार देणाऱ्या महिलेकडे 50 लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्तासुनील आल्हाट यास गुन्हे शाखेच्या(crime branch) पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. त्याच्यासह चौघाविरुद्ध दिलेल्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (shivajinagar police station)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
शिवभोजन थाळी केंद्रातील ‘सेवा’ कागदावरच!

सुनील आल्हाट, सुभाष उर्फ अण्णा जेउर, निलेश जगताप व विवेक कोंडे अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.याप्रकरणी एका 48 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कोथरुड परिसरात राहतात. महिलेच्या पतीविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होती. या तक्रारीबाबत महिलेने आल्हाट याच्याशी संपर्क साधला होता, त्यावेळी त्याने महिलेला "आपली पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी ओळख आहे, आत्तापर्यंत 32 पोलिसांना निलंबित केले आहे, तुमचे पैसे 8 दिवसात मिळवून देतो."

असे सांगून महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेस पोलिस उपनिरीक्षक सोनवणे यांच्याविरुद्ध लेटर हेडवर तक्रार देण्यास भाग पाडले. त्यानुसार, त्यांनी तक्रार दिली. दरम्यान, त्याने महिलेला बोलावून त्यांच्याकडे 50 लाख रूपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास तक्रार मागे घेऊ देणार नाही, तसे न केल्यास तुम्हाला ही लटकवून टाकेल, अशी धमकी दिली. तसेच आरोपीच्या साथीदारानी ही फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने आल्हाटला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com