मगनलाल चिक्कीला नोटीस 

मगनलाल चिक्कीला नोटीस 

पुणे - चिक्कीचा प्रत्येक घास खाण्यास सुरक्षित असेल, अशी प्रयोगशाळेची मोहर उमटेपर्यंत विक्री करू नये, अशी नोटीस अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) लोणावळ्यातील मगनलाल चिक्कीला मंगळवारी दिली. अन्नसुरक्षा व मानदे कायद्याच्या (एफएसएसए) आधारे ही कारवाई करण्यात आली. 

लोणावळ्यातील मगनलाल चिक्कीच्या उत्पादनाची तपासणी ‘एफडीए’ने केली. चिक्कीचे उत्पादन करताना ठळक दोष आढळल्याने ही कारवाई करण्यात आली. त्याबाबतची नोटीस मगनलाल फूड प्रॉडक्‍ट्‌सचे भागीदार अशोक अगरवाल यांना बजावण्यात आली. 

फूड प्रॉडक्‍टमध्ये विक्रीसाठी उत्पादित केलेल्या कोणत्याही अन्नपदार्थाची अन्नसुरक्षा व मानदे कायद्याने मान्यता दिलेल्या ‘एनएबीएल’ प्रयोगशाळेकडून तपासणी करत नसल्याचे या तपासणीत आढळले; तसेच या पदार्थांची विश्‍लेषण करण्याची कोणतीच सुविधा नाही. येथे उत्पादन अन्नपदार्थ मानवाने खाण्यास सुरक्षित असल्याची हमी मिळत नाही. त्यामुळे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून अन्नपदार्थांची तपासणी होईपर्यंत विक्री करू नये, अशी नोटीस अन्नसुरक्षा अधिकारी आर. आर. काकडे यांनी बजावली. 

उत्पादनावरील लेबलमध्येही दोष असल्याचे या तपासणीत आढळले. त्यामुळे हे त्रुटी असलेले लेबल पॅकिंग करताना वापरू नये, असेही यात नमूद केले. अन्नसुरक्षा अधिकारी एफ. एस. सावंत, आर. आर. काकडे यांनी सहआयुक्त सुरेश देशमुख आणि सहायक आयुक्त संपत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. 

याबाबत अगरवाल म्हणाले, ‘‘केवळ तांत्रिक बाबींची चौकशी करण्यात आली असून, आवश्‍यक असणारी कागदपत्रे उद्या अन्न व औषध प्रशासनाकडे सादर करणार आहे.’’

लोकांना सुरक्षित अन्नपदार्थ मिळावेत, हा अन्नसुरक्षा व मानदे कायद्याचा उद्देश आहे. या कायद्यांतर्गत जनहित व जनआरोग्याच्या उद्देशाने मगनलाल फूड प्रॉडक्‍टला निर्देश देण्यात आले आहेत.
- सुरेश देशमुख, सहआयुक्त,  अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com