#SathChal "साथ चल''साठी मगर महाविद्यालय सिद्ध

कृष्णकांत कोबल
मंगळवार, 3 जुलै 2018

मांजरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह व फिनोलेक्स केबल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या संगोपनाची ही संकल्पना घेऊन "साथ चल'' हा उपक्रम राबविला जात आहे. त्यामध्ये सहभागी होऊन आईवडील व कुटुंबासाठी दिंडीमध्ये दोन पावले चालण्याचा निर्धार हडपसर येथील शाळा महाविद्यालयांनी केला आहे.     

अण्णासाहेब मगर महाविद्यालयामध्ये प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी विद्यार्थ्यांना साथ चल उपक्रमात सहभागी होण्याची शपथ दिली. लोहिया उद्यानात आई-वडील व कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी शपथ घेऊन गाडीतळ पर्यंत दिंडीत सहभागी होणार असल्याचा निर्धार शिक्षक व विद्यार्थ्यांनी बोलून दाखविला. 

Web Title: magar college ready for saath chal