esakal | पुणेकरांनो, मॅगी, पाणीपुरीचा स्टॉकच संपला
sakal

बोलून बातमी शोधा

Maggie and Panipuri stock ran out of stock in pune

पुण्यात आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा १० दिवसांचा लाॅकडाऊन सुरू होत आहे. तसेच पुढचे पाच दिवस सलगकिराणा दुकाने, भाजी, चिकन, मटण, मद्य यासह  सर्वच दुकाने बंद रहाणार आहेत. सकाळच्या वेळेत केवळ दुध विक्री सुरू रहाणार आहे. पुढचे पाच दिवस खाद्यपदार्थ व भाजीचा तुटवडा होऊ नये यासाठी तीन दिवस सामान खरेदीसाठी वेळ देण्यात आला होता. 

पुणेकरांनो, मॅगी, पाणीपुरीचा स्टॉकच संपला

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील

पुणे : गेले दोन दिवस मोठ्याप्रमाणात भाजी व  किराणा सामान खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी भयंकर गर्दी केली, यात सोशल डिस्टन्सींगचा पार फज्जा उडाला होता. मात्र, सोमवारी सकाळपासून ग्राहकांची गर्दी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्यात आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा १० दिवसांचा लाॅकडाऊन सुरू होत आहे. तसेच पुढचे पाच दिवस सलगकिराणा दुकाने, भाजी, चिकन, मटण, मद्य यासह  सर्वच दुकाने बंद रहाणार आहेत. सकाळच्या वेळेत केवळ दुध विक्री सुरू रहाणार आहे. पुढचे पाच दिवस खाद्यपदार्थ व भाजीचा तुटवडा होऊ नये यासाठी तीन दिवस सामान खरेदीसाठी वेळ देण्यात आला होता. 

लाॅकडाऊनची घोषणा झाल्यानंतरच सर्वच भागात रांगा लागल्या होत्या. काल रविवारी तर भयंकर गर्दी झाल्याने यातूनच कोरोनाची लागन होण्याची भीती वाटावी अशी स्थिती होती.  वाढत्या गर्दीचा फायदा घेत भाजी विक्रेत्यांनी अव्वाच्या सव्वा दर लावून ग्राहकांची लूट सुरू केली. जवळपास सर्वच भाज्यांचे दर ३० रुपये पाव किलो पर्यंत गेले होते. आजही भाज्यांचे दर चढेच होते. पण शनिवार आणि रविवारपेक्षा आज तुलनेने गर्दी कमी होती मात्र, दुकानांपुढे सामान खरेदीसाठी गर्दी कायम होती. किराणा दुकानात गहू, तांदूळ, तेल, साखर या मुबलक उपलब्ध असले तरी काही वस्तूंचा तुटवडा होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मॅगी, पाणीपुरीचे साहित्य संपले
''बहुतांश किराणा दुकानातून मॅगीचा साठा कालच संपून गेला. त्यामुळे अनेक जण मॅगीच्या शोधात फिरत होते. पाच दिवस सर्वकाही बंद असणार आहे, त्यामुळे सामान भरताना लोकांनी मॅगी, बिस्कीट, पाणी पुराचे साहित्य, केकचे साहित्य खरेदी केल्याने त्याचा स्टाॅक संपला असल्याचे दुकानदारांनी सांगितले.''

पुणेकरांनो, नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार 
 

Edited by : Sharayu Kakade

loading image