कसबा पोटनिवडणुकीसाठी मविआत रस्सीखेच! राष्ट्रवादीच्या डझनभर इच्छुकांची यादी आली समोर : Kasba By-Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ncp

Kasba By-Election: कसब्यासाठी मविआत रस्सीखेच! राष्ट्रवादीच्या डझनभर इच्छुकांची यादी आली समोर

पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादीतूनही डझनभर इच्छुक आहेत. याची यादीच समोर आली आहे. यामुळं आता कसबा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. (Maha vikas Aghadi tussle for Kasaba by election list of dozens of aspirants of NCP)

काँग्रेस आणि शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही या जागेवर दावा केला आहे. शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची यासंदर्भात पुण्यात बैठक झाली. या बैठकीत एकूण दहा इच्छुकांची नावं प्रदेशाकडं पाठवण्याचा निर्णय झाला आहे.

कसबा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे, त्याचप्रमाणे माहविकास आघाडीतील इतर पक्षामध्ये निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून अपेक्षित हालचाल दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक लढवली पाहिजे असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला, अशी माहिती सुत्रांकडून कळते.

'हे' आहेत राष्ट्रवादीचे इच्छुक उमेदवार

कसबा पेठ विधानसभा पोट निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून अंकुश काकडे, अण्णा थोरात, रवींद्र माळवदकर, गणेश नलावडे, वनराज आंदेकर, रूपाली पाटील, शिल्पा भोसले, दत्ता सागरे या प्रमुख नावासह एकूण 10 इच्छुकांची नावं समोर आली असून यांची नावं प्रदेश कार्यालयाकडं पाठवण्यात येणार आहेत.