पुणे - मांजरीत महा योजना शिबिराचे आयोजन

कृष्णकांत कोबल 
बुधवार, 28 मार्च 2018

मांजरी (पुणे) : गंगानगर येथील नवचैतन्य मित्र मंडळाच्या विद्यालयांमध्ये आयोजित केलेल्या "महा योजना शिबिरा'' मध्ये सुमारे तीन हजार नागरिकांनी भेट दिली. त्यातील 50 लाभार्थ्यांनी कागददपत्राची पूर्तता केल्याने त्यांना जागेवरच योजनेचा लाभ घेता आला. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणासह विविध सरकारी विभागांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव प्रदीप अष्टूरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व संविधानाची पूजा करून शिबिराचे उद्घाटन झाले. तहसीलदार अर्चना यादव, जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे  सचिन राऊत, प्रमोद बनसोडे, श्रीकांत कांबळे, पंचायत समिती सदस्या रोहिणी,  उषाताई ढोरे, संस्थेचे सचिव बळीराम बडेकर, संचालक प्रल्हाद जगताप, सुधीर बडेकर आदी उपस्थित होते.  

यावेळी आधारकार्ड, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास मंडळ, अन्न धान्य वितरण विभाग, कामगार विभाग, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वित्तीय सेवा विभाग, भारत सरकार,  महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार कल्याणकारी मंडळ, समाज विकास विभाग, आरोग्य विभाग,  pan कार्ड, घनकचरा व पोस्ट अण्णाभाऊ साठे अशा विविध सरकारी विभागांच्या योजनांची माहिती, अर्जाची उपलब्धता अर्ज स्वीकृती, योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे याच शिबिरात उपलब्ध करण्यात आली होती.

आधारकार्ड व अन्नधान्य वितरण विभागास नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ज्या नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यांच्या कामाबाबत पाठपुरावा करून काम मार्गी लावणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सचिव प्रदीप अष्टूरक म्हणाले, "ग्रामीण व शहरी असा मध्य साधून हे शिबीर घेण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारी योजनांचा लाभ मिळावा हा मुख्य हेतू या शिबिराचा आहे.''

Web Title: maha yojana shibir organised in manjari pune