राजतरंगिणी महाकाव्य लवकरच मराठीत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

पुणे - भारतीय इतिहास लेखनातील पहिले पुस्तक मानले जाणारे आणि काश्‍मिरी कवी कल्हण यांनी संस्कृतमधून लिहिलेले ‘राजतरंगिणी’ हे महाकाव्य लवकरच मराठी भाषेतून वाचकांसमोर येत आहे. त्याचा अनुवाद कवयित्री डॉ. अरुणा ढेरे करत आहेत.

डॉ. ढेरे गुरुवारी (ता. २) वयाची साठ वर्षे पूर्ण करत आहेत. यानिमित्ताने ‘सकाळ’ने त्यांच्याशी संवाद साधला. ‘राजतरंगिणी’चा अनुवाद करण्यात सध्या त्या गुंतल्या आहेत.

‘सरहद’ आणि ‘चिनार पब्लिकेशन’च्या वतीने हे महाकाव्य लवकरच प्रकाशित होणार आहे. या संदर्भात त्या म्हणाल्या, ‘‘काश्‍मीरमधील राजांचा इतिहास, तेथील संस्कृती यावर हा ग्रंथ आहे. तो मराठीत आणण्याची संधी मिळतेय, याचे वेगळेच समाधान आहे.’’

संमेलनाध्यक्षपदाबाबत डॉ. ढेरे म्हणाल्या, ‘‘मला इतक्‍यात हे पद नकोय. नीरजा, आशा बगे, प्रभा गणोरकर अशी कितीतरी योग्य नावे या पदासाठीसांगता येतील. मला या पदापेक्षा व्यासंग पुढे नेत राहणे, लेखन करत राहणे अधिक महत्त्वाचे वाटत आहे. विचार व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे व्यासपीठ आहेतच.’’ संमेलनाध्यक्षपदासाठी लेखिका हिरिरीने पुढे येत नाहीत, हे खरे आहे, असेही त्या म्हणाल्या.

निवडक ढेरे
अण्णांच्या (रा. चिं. ढेरे) नावाने सुरू केलेल्या संस्थेचे काम पुढे घेऊन जाणे, हे ध्येय समोर आहे. त्यांची संशोधकीय दृष्टी काय होती, याचे दर्शन व्हावे यासाठी ‘निवडक ढेरे’ हा ग्रंथ आम्हाला इंग्रजीतून प्रकाशित करायचा आहे. त्याची तयारीही सध्या सुरू आहे. वेगवेगळे ग्रंथ, प्रकल्प, कार्यशाळा, व्याख्याने या माध्यमांतून ही संस्था कार्यरत राहील, असे अरुणा ढेरे यांनी सांगितले.

Web Title: mahakavya in marathi

टॅग्स