म्हाळुंगे बनणार आदर्श गाव - पालकमंत्री बापट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

पुणे - ‘म्हाळुंगे हे नगररचना योजनेच्या माध्यमातून (टीपी स्कीम) आदर्श गाव बनविण्यात येईल,’ असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी गावकऱ्यांना दिले. 

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) म्हाळुंगे ग्रामपंचायत सक्षमीकरण योजनेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी वितरण कार्यक्रम पार पडला, त्या वेळी पालकमंत्री बापट बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सरपंच मयूर भांडे, ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ‘‘म्हाळुंगे गावाच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहती उभ्या राहात आहेत. येथून हिंजवडी आयटी पार्क जवळच आहे. यामुळे गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी इमारती बांधण्यात येत आहेत. या बांधकामावरील शुल्कातून म्हाळुंगे गावाच्या विकासाची विविध कामे हाती घ्यावी. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.’’

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी ग्रामस्थांच्या मूलभूत गरजा पूर्ण होणे गरजेचे आहे. या विकासकामासाठी अभ्यासपूर्ण नियोजन महत्त्वाचे आहे. कचऱ्याची विल्हेवाट, वाहतूक कोंडी व पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.’’ 

हिंजवडी परिसरात विविध आयटी कंपन्या कार्यरत आहेत. येथील उद्योजकांना उच्च दर्जाच्या सोईसुविधा मिळाव्यात यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हिंजवडी आयटी इंडस्ट्रीज असोसिएशन आणि विविध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात आयटी पार्क परिसरातील घनकचरा व्यवस्थापन, पोलिस स्टेशन उभारणी, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व सुधारणा, परिसरात काम करणाऱ्यांसाठी चांगल्या दर्जाची वाहतूक व्यवस्था, रस्त्यावरील खड्डे बुजविणे इत्यादी कामे त्वरित करण्याबाबत बापट यांनी आदेश दिले.

म्हाळुंगे-नांदे-चांदे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन 
पीएमआरडीएतर्फे तयार करण्यात येत असलेल्या म्हाळुंगे-नांदे-चांदे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. याच भागात हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. रस्त्याच्या कामासंदर्भात स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांनी अडचणी समजावून घेतल्या.

Web Title: mahalunge modern village girish bapat