महामेट्रोचे जुलैमध्ये दुसरे गर्डर लाँचर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

पिंपरी - मेट्रोचे दुसरे गर्डर लाँचर जुलैच्या पहिल्या आठवड्यात दापोडी येथे बसविण्यात येणार आहे. त्यामुळे व्हायाडक्‍ट उभारणीच्या कामाला वेग येईल. खराळवाडी येथे बसविलेल्या गर्डर लाँचरद्वारे व्हायाडक्‍टचे बारा स्पॅन पूर्ण झाले असून, तेराव्या स्पॅनचे सेगमेट बसविण्यास मंगळवारी प्रारंभ झाला.

पुणे-मुंबई रस्त्यावर वल्लभनगर एसटी बस स्थानकाजवळ संत तुकारामनगर मेट्रो स्थानकाच्या पहिल्या प्लॅटफॉर्मसाठी पिलर आर्म बसविण्याचे काम सुरू झाले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधील मेट्रोचे हे पहिले स्थानक आहे. त्याचे दहा खांब उभारले आहेत. खांबांच्या साडेपाच मीटर उंचीवर दोन्ही बाजूला साडेदहा मीटर अंतराचे पिलर आर्म बसविण्यात येणार आहे. त्याची लांबी दोन मीटर आणि रुंदी तीन मीटर आहे. 

स्थानकाची लांबी १४० मीटर आणि रुंदी २१ मीटर आहे. पहिला प्लॅटफॉर्म पूर्ण झाल्यानंतर त्याच्या खालून सर्व प्रकारच्या वाहनांना ये-जा करता येईल. दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी येथील स्थानकांसाठी खांब उभारण्याचे काम हाती घेतले आहे. 

पावसाळ्यात खांबांच्या पायाचे काम करण्यात अडचणी येतात. त्यामुळे पुढील काळात खांब, पिलर कॅप बसविण्याच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच नाशिक फाटा येथील दुहेरी उड्डाण पुलाजवळील खांब उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

हॅरिस पूल ते खराळवाडीदरम्यान शंभरपेक्षा अधिक खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. पावसाळ्यात खांब उभारणी व व्हायाडक्‍टची कामे सुरू राहतील. तिसरे गर्डर लाँचर ऑगस्टमध्ये संत तुकारामनगर येथे बसविण्याचे नियोजन आहे. 
- गौतम बिऱ्हाडे,  मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, महामेट्रो

Web Title: mahametro second girder launcher in july