esakal | '... तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ'
sakal

बोलून बातमी शोधा

BJP-NCP

शरद पवार आणि अजित पवार यांनी निवडणूकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर व्यक्तीगत टीका केल्यानंतर कार्यकर्तेही स्वैरपणे टीका करु लागले.

'... तर आम्ही जशास तसे उत्तर देऊ'

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती : विधानसभा निवडणूक पार पडून एक आठवडा उलटला असला तरी निवडणुकीबाबतच्या चर्चा थांबण्याचं नाव घेत नाहीत. प्रतिस्पर्ध्यांवर आरोप-प्रत्यारोपांची फैरी झाडल्या गेल्या. आता निवडणूक आचारसंहिता पूर्णपणे संपल्याची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी हातची बाकी शून्य करण्यास सुरवात केली आहे.

राष्ट्रवादीने गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. या पार्श्वभूमीवर महानंदचे संचालक दिलीप खैरे आता आक्रमक झाले आहेत. ही टीका थांबवली नाही, तर आम्हीही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराच त्यांनी दिला आहे. 

- ही आहे प्रकाश आंबेडकर यांची वंचितबद्दल भूमिका!

या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खैरे यांनी नमूद केले आहे की, कोथरुडमध्ये महाआघाडीला उमेदवारही देता आला नाही. मनसेला पाठिंबा देण्याची नामुष्की आली. 'जनतेतून निवडून या' असे आव्हान शरद पवार यांच्याकडून वारंवार दिले जात होते. ते आव्हान स्वीकारून पाटील जनतेतून निवडून आले. भाऊबीजेला त्यांनी साडी वाटप केले, यात काहीच गैर नव्हते. मात्र राष्ट्रवादीचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी होती. खालच्या दर्जाचे राजकारण करत राष्ट्रवादीने आपला मूळ स्वभाव दाखविला आहे. 

- पक्षाच्या आमदाराला पाडणाऱ्यालाच भाजपने घेतले सोबत

शरद पवार आणि अजित पवार यांनी निवडणूकीदरम्यान चंद्रकांत पाटील यांच्यावर व्यक्तीगत टीका केल्यानंतर कार्यकर्तेही स्वैरपणे टीका करु लागले. मात्र, नेत्यांनीच सुसंस्कृतपणा दाखविणे गरजेचे होते. 

- खासदार मंडलिक म्हणाले, माझी अवस्था कल्हईच्या भांड्यासारखी 

यापुढील काळातही पाटील हे बारामतीत पक्ष विस्तारासाठी ताकद देतील. आम्हीही निकालातून योग्य तो बोध घेत पक्ष बांधणीसाठी आवश्यक ते प्रयत्न करू; परंतु राष्ट्रवादीने त्यांना नाहक लक्ष्य करणे थांबवले नाही, तर आम्हीही जशास तशे उत्तर देण्यास सक्षम आहोत, असे दिलीप खैरे यांनी नमूद केले आहे.

भाजप राष्ट्रवादी