Manchar News : महाराष्ट्रातील 20 हजार ग्रामीण भागातील डाक सेवक मंगळवारपासून बेमुदत संपावर

संपात राज्यातील वीस हजार व पुणे जिल्ह्यातील एक हजार ५०० डाकसेवक सहभागी होणार आहेत.
maharashtra 20 thousand dak sevak on strike from tuesday manchar marathi news
maharashtra 20 thousand dak sevak on strike from tuesday manchar marathi newsesakal

मंचर : आधुनिक संचार माध्यमाच्या काळातही आपले अस्तित्व टिकवून असलेल्या पोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी देशव्यापी संप मंगळवार (ता.१२) पासून पुकारला आहे. या संपात राज्यातील वीस हजार व पुणे जिल्ह्यातील एक हजार ५०० डाकसेवक सहभागी होणार आहेत. परिणामतः ग्रामीण भागातील डाकसेवा ठप्प होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील डाक कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत संप सुरू राहणार असल्याचा इशारा अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेचे पुणे ग्रामीण विभागाचे सचिव एकनाथ मंडलिक यांनी दिला.

ते म्हणाले “ग्रामीण भागातील डाक सेवकांना विविध समस्यांना दररोज सामोरे जावे लागत आहे. कामाची वेळ आठ तासाची मात्र त्यांना चार तासाचेच वेतन मिळत आहे. संघटनेच्या वतीने जी.डी.एस कर्मचान्यांना आठ तासाचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे,

maharashtra 20 thousand dak sevak on strike from tuesday manchar marathi news
Old Pension : सरकारच्या 'या' कर्मचाऱ्यांना मिळणार जुन्या पेन्शन योजनेचा लाभ; 30 नोव्हेंबरपर्यंत फायनल ऑर्डर

विभागीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारी रजा, घरभाडे भत्ता, टीए/डीए, पेन्शन, मेडिकल सुविधा, शिक्षण भत्ता सुविधा लागू कराव्यात. इंडीया पोस्ट पेमेंट बैंकचे काम कमिशन ऐवजी वर्कलोडमध्ये सामाविष्ट करण्यात यावे.

“महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवार (ता.१२) पासुन सुरू होणाऱ्या संपात सर्व डाक कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे.”

maharashtra 20 thousand dak sevak on strike from tuesday manchar marathi news
Pune News : माळरानांवरील ६५ वनस्पती होताहेत नष्ट; ‘मिशिगन’चे डॉ. आशिष नेर्लेकर यांचे संशोधन

असे आवाहन अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्या पुणे ग्रामीण विभागाचे आंबेगाव तालुका संघटन सचिव हरिभाऊ थोरात यांनी केले.

“डाक कर्मचारी संपावर गेल्यामुळे ग्रामीण भागातील बचत खाते भरणा, स्पीड बुकिंग वाटप, मुलाखत पत्र, मनीऑर्डर सेवा, रजिस्ट्री पत्र, आरडी, वीज बिल भरणा, सुकन्या योजनेचे काम ठप्प होणार आहे. तसेच पंतप्रधान किसान नमो योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com