
ज्या लोकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आहे; अशा सुमारे 93 हजार 655 जणांना घरीच विलग राहण्याच्या (होम क्वॉरंटाइन) सूचना केल्या आहेत.
पुणे : राज्यात गेल्या चार दिवसांच्या तुलनेत कोरोनाचे नवे रुग्ण आणि मृतांचीही संख्या सोमवारी (ता.20) थोडीफार कमी झाली; तेव्हाच कोरोनामुक्त होऊन घरी गेलेल्यांची संख्या मात्र वाढली असून, दिवसभरात 65 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे.
- बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विविध शहरांत 433 नवे रुग्ण सापडले असून, त्यांचा एकूण आकडा 6 हजार 666 पर्यंत गेला आहे. तर राज्यात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. परिणामी, मृतांची एकूण संख्या 223 झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत एका दिवसात सर्वाधिक 65 रुग्ण बरे झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
- देशातील ५९ जिल्हे कोरोनामुक्त; नियमभंगाप्रकरणी केरळ सरकारची कानउघडणी!
मुंबईतील सात आणि मालेगावातील दोघांचा मृत्य झाला असून, त्यात सहा पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये 40 पेक्षा कमी वयाचा एक रुग्ण आहे. मृतांना उच्चरक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हदयरोग, मूत्रपिंडाचे आजार असल्याचेही पुढे आले आहे. राज्यभरातून आतापर्यंत तपासणीसाठी पाठविलेल्या 76 हजार 92 पैकी 71 हजार 611 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, त्यातील 4 हजार 666 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. या कोरोनाबाधितांपैकी 572 जण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
- पालघर साधू हत्याकांड प्रकरण : CM उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण, दोन पोलिस अधिकारीही निलंबित...
सध्या राज्यभरातील 21 लाख 85 हजार लोकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे. ज्या लोकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला आहे; अशा सुमारे 93 हजार 655 जणांना घरीच विलग राहण्याच्या (होम क्वॉरंटाइन) सूचना केल्या आहेत. तर 6 हजार 879 जण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.
- वडिलांच्या निधनानंतर योगी आदित्यनाथांचं आईला भावनिक पत्र!
सोमवारी दिवसभरातील नवे रुग्ण : 433
एकूण रुग्ण : 4 हजार 666
मृत : 9
एकूण मृत : 223
सोमवारी बरे झालेले रुग्ण : 65
बरे झालेले एकूण रुग्ण : 572