ऊस उत्पादन, 'रिकव्हरी'त महाराष्ट्राला 'यूपी'ची टक्कर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

माळेगाव : ''महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशात उसाचे क्षेत्र जास्त असून, साखर कारखानेही अधिक आहेत. तेथे पूर्वी एकरी उसाचे उत्पादन व रिकव्हरी (साखर उतारा) कमी मिळत होती. मात्र, अलीकडे उत्तर प्रदेशमध्ये रिकव्हरी साडेअकरापर्यंत, तर उसाचे एकरी उत्पादन सरासरी तीस टनांपर्यंत वाढले आहे. ही आकडेवारी महाराष्ट्राच्या जवळपास येऊन पोचली आहे. महाराष्ट्राचे ऊस उत्पादनातील अग्रस्थान टिकविण्यासाठी कारखान्यातील शेती विभाग सक्षम केला पाहिजे,'' असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. 

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेच्या वतीने गुरुवारी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. ''कारखान्यातील शेती विभाग हा केवळ ऊस तोडणी वाहतुकीचे नियोजन करणारा विभाग म्हणून ओळखला जातो. या समस्येमुळेच राज्यातील उसाचे एकरी उत्पादन घसरत चालले आहे,'' अशी चिंता पवार यांनी व्यक्त केली.

ते म्हणाले, ''एकेकाळी एकरी उत्पादनात आणि रिकव्हरीमध्ये महाराष्ट्रातील ऊस उत्पादक देशात पहिल्या क्रमांकाचा होता. असे असताना उत्तर प्रदेशसारखी इतर राज्ये आपल्या पुढे निघाली आहेत. आपण मात्र या सगळ्या प्रक्रियेत घसरत चाललो आहोत. हे चित्र बदलण्यासाठी कारखान्याचा शेती विभाग खऱ्या अर्थाने सक्षम करावा लागेल आणि त्यासाठी कारखान्याचे प्रशासन आणि व्हीएसआय, अजैविक ताण व्यवस्थापन संस्थांमधील संशोधक शास्त्रज्ञांचा समन्वय खूप महत्त्वाचा ठरणार आहे.'' 

उसासाठी हवामान, लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान, महाराष्ट्रातील उसाचे वाण, पाण्याचे नियोजन व ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन, उसाच्या विकासाचे तंत्र सांगणारी 'व्ही. एस. आय' संस्थेबाबत पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

Web Title: Maharashtra and Uttar Pradesh are in tough competition in Sugarcane production, says Sharad Pawar