

Minister Chandrakant Patil Calls Devendra Fadnavis Divine Leader Remark Draws Attention Across Maharashtra Politics
sakal
पुणे : ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये निर्णयक्षमता, संवेदनशीलता, माणुसकी, वेळेचे काटेकोर नियोजन आणि अभ्यासू वृत्ती यांचा दुर्मीळ संगम आहे. फडणवीसांमध्ये दैवी गुण आहेत, कारण एका माणसात इतके गुण कधीच नसतात. शेतकरी कर्जमाफीपासून मराठा आरक्षणापर्यंत अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांनी घेतलेली भूमिका त्यांच्या नेतृत्वाची ताकद दाखवते, ’’ असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.