

weather forecast Maharashtra cold wave
esakal
Weather News Today : सलग दुसऱ्या दिवशी शहरासह जिल्ह्यातील किमान तापमानात दोन ते तीन अंशांने घट झाल्याने शहरात थंडी वाढली आहे. पाषाण येथे थंडीचा पारा सात अंशांपर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यातील बारामती, माळीण तर शहरातील पाषाण आणि शिवाजीनगर परिसरात पुन्हा थंडी वाढली असून, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील थंडीचा कडाका कायम राहील व हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे.