महाराष्ट्र दिन, कामगार दिन विविध उपक्रमांनी साजरा 

महाराष्ट्र दिन, कामगार दिन विविध उपक्रमांनी साजरा 

पुणे - सुरक्षा दलाचे जवानांचे पथसंचलन... व्याख्यानातून उलगडलेले महाराष्ट्र दिनाचे महत्त्व अन्‌ विविध संस्था-संघटनांच्या कामगारांचा पुरस्काराद्वारे गौरव अशा उत्साहपूर्ण वातावरण शहरात महाराष्ट्राचा 57 वा स्थापना दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यास संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तर व्याख्याने, चर्चासत्र आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले. 

पुणे महापालिकेतर्फे मनपा प्रांगणातील महात्मा जोतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) राजेंद्र जगताप, नगरसेविका पल्लवी जावळे उपस्थित होते. कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर अग्निशामक दल व सुरक्षा दलाने पथसंचलनाद्वारे मानवंदना दिली. 

शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे हिराबाग येथील पक्ष कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. विरोधी गटनेते चेतन तुपे यांनी ध्वजवंदन केले. खासदार तथा शहराध्यक्ष ऍड. वंदना चव्हाण, युवराज बेलदरे, अशोक कांबळे, परवीन फिरोज शेख उपस्थित होते. 

नवीन मध्यवर्ती इमारतीच्या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. 

शहर कॉंग्रेसचे योगेश भोकरे यांनी कामगार दिनाचे महत्त्व सांगितले. बबलू कोळी, विवेक शिंदे, विजय तिकोने, गोपाळ पायगुडे उपस्थित होते. 

शहर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. शहर राष्ट्रीय मजदूर संघातर्फे (इंटक) ऍड. फय्याज शेख यांनीही पुष्पहार अर्पण केला. मनोहर गाडेकर, अनिल औटी, योगेश मारणे, अनिल निंबाळकर उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कसबा विभागातर्फे अखिल मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. वसंत खुटवड, सारंग सराफ, शंकर गुजराथी उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) येथे संस्थेचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. संस्थेचे सचिव लतीफ 

मगदूम, डॉ. एन. वाय. काझी, शाहीद इनामदार, शाहीद शेख, डॉ. रशीद शेख, प्राचार्य डॉ. शैला बूटवाला उपस्थित होते. 

जय भवानी टेक्‍निकल संस्थेच्या वतीने कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. राधिका मखामले, संतोष व्हावळ, दत्तात्रेय पवार उपस्थित होते. महापालिका सेवानिवृत्त सेवक कृती समितीतर्फे आयोजिलेल्या कार्यक्रमात राजाभाऊ धडे आणि संतोष सपकाळ यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व विशद केले. साहेबराव खंडाळे, सुनील खंडाळे, वसंत वाघमारे आणि उद्धव लांडगे उपस्थित होते. योग-आनंद संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गांधी आणि सहकाऱ्यांनी कामगारांना शुभेच्छा दिल्या. शिवाजीनगर येथील कामगार पुतळा येथे शिवबसव भीमशक्ती हमाल, माथाडी आणि जनरल कामगार संघातर्फे कामगार मेळावा घेण्यात आला. भाऊसाहेब आंधळकर, दारासिंग मोरे, शिरीष पाटील यांनी कामगाराच्या विविध सरकारी योजनांची माहिती दिली. या निमित्ताने जालिंदर मोरे यांनी 83 वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. गणेश मोरे, दीपक जावळे, साई मोरे व धनराज मोरे उपस्थित होते. बापूसाहेब पाटोळे लोकसेवा संस्थेतर्फे भवानी पेठेतील टिळक मार्केट येथील कामगारांचा सत्कार करण्यात आला. रवी पाटोळे, महेश बॅंकेचे अध्यक्ष पूनमचंद धूत आणि दलित स्वयंसेवक संघाचे प्रमुख सोपानराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला. कामगारांना उन्हाळी टोप्यांचे वाटप केले. सिद्धेश्‍वर जाधव, दादासाहेब सोनवणे व संपत जाधव उपस्थित होते. सक्षम परिवर्तन संस्थेतर्फे 1500 कामगारांनी थंडगार ताकाचा आस्वाद घेतला. संस्थेचे कुमार प्रियदर्शन, प्रसाद बाबर, गौरी गाडगीळ, सायमन ख्रिस्तोफर व सैफ शेख उपस्थित होते. 

पीएमपीएलमध्येही कार्यक्रम 
पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे महाराष्ट्राचा 57 वा स्थापना दिन आणि कामगार दिन उत्साहात साजरा झाला. पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. महामंडळाच्या सहव्यवस्थापकीय संचालक दगा मोरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा कोल्हे उपस्थित होते. या निमित्ताने मुंढे यांनी कामगारांना शुभेच्छा देत नियोजनबद्ध आणि प्रामाणिक कामामुळे आपण स्वावलंबी होऊ शकतो असे मत व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com