

ANTIF Maharashtra Destroys 9,536 Kg Seized Drugs
esakal
अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) पुणे आणि धुळे जिल्ह्यांमध्ये केलेल्या मोठ्या कारवाईनंतर जप्त झालेल्या अमली पदार्थांची कायदेशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली आहे. एकूण ९ हजार ५३६ किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत १२ कोटी २९ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.