Ajit Pawar : महाराष्ट्रात सध्यातरी कर्ज माफी होणार नसल्याने शेतकर्‍यांनी बॅंकाचे पैसे भरावेत; अजित पवार यांचे आवाहन

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसह कर्जदारांनी कर्ज माफीचा विचार सोडून ३१ मार्च अखेर बॅंकांचे पैसे ताबडतोब भरावेत.
Ajit Pawar
Ajit Pawarsakal
Updated on

माळेगाव - महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसह कर्जदारांनी कर्ज माफीचा विचार सोडून ३१ मार्च अखेर बॅंकांचे पैसे ताबडतोब भरावेत. कर्ज माफी करण्यासारखी सध्यातरी आर्थिक स्थिती नाही. मी महाराष्ट्राचा ११ वेळा लोकाभिमूक अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांना वीज माफ दिली. पीक कर्जाच्या व्याजात सवलत दिली. दुधाचे अनुदान दिले.

लाडकी बहीन योजनेसाठी सुमारे ४० हजार कोटींचा बोजा सरकारने पेलला. यापुढे अर्थव्यवस्थेला पोषक वातावरण तयार करण्यासाठी शिस्तीने वागण्याची जबाबदारी जशी राज्यकर्त्यांच्या आहे तशी प्रत्येक घटकांचीही आहे, अशी महत्वपुर्ण भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगावात स्पष्ट केली.

माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना प्रशासनाने नुतनिकरण केलेल्या आश्वारूढ पुतळ्याचे आनावरण आज अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी शेतकरी मेळाव्यात पवार बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय ) प्रभावी वापर ऊस पिकासह कृषी क्षेत्रात झाला तर त्याचे सकारात्मक परिणाम अर्थकारणावर दिसून येईल.

त्या कामी प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद केली, असे श्री.पवार यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, `राज्यात बहुतांशी साखर कारखान्यांची गाळप क्षमता दुप्पट झाली आणि त्या तुलनेत ऊसाची उपलब्धता होत नाही. त्यासाठी एआय तंत्रज्ञान बारामतीमध्येच विकसित झाले आहे.

एकरी ऊस उत्पन्न शंभर टनापेक्षा अधिक होण्यासाठी पाणी, खत व्यवस्थापन करणे या तंत्रज्ञानाने सोपे झाले आहे. एका बाजूला शिवारात एआय तंत्रज्ञान येण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेमार्फत अर्थिक मदत करणे आणि दुसऱ्याबाजूला १ हजार कोटींची महत्वकांक्षी कऱ्हा व नीरा नदी उपसा सिंचन योजना बारामतीत यशस्वी करण्यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून प्रंचड कष्ठ करत आहे.`

विरोधकांच्या (सुप्रिया सुळे व युगेंद्र पवार यांचे नाव न घेता) आंदोलनाचा खरुपूस समाचार घेताना पवार म्हणाले, 'अधिकाऱ्यांना भेटणे, फोटो काढून आणि सेल्फी काढून प्रश्न सुटत नाहीत. साखर उद्योगात काय यांना समजते..तेव्हा आंदोलन करायचा हे निघाले. सुरवातीला पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली माळेगाव, सोमेश्वर कारखानाने चालले.

आता मात्र माझ्या नेतृत्वाखाली राज्यात प्रथम क्रमांकाचे दर देणारे हे कारखाने मोठे झाले. ही वस्तूस्थिती आहे. वास्तविक साखरेचे कमी दर आणि त्यातुलनेत होणारा कर्जाचा बोजा नको म्हणून सुरवातीला माळेगाव व सोमेश्वर, छत्रपती कारखान्यांनी २८०० रुपये अॅडव्हास दिला.

त्यानंतर पैशाची उपलब्धता झाली, की माळेगावने एफआरपीपेक्षा अधिक ३१३२, सोमेश्वरने ३१७३ अॅडव्हास सर्वाधिक सभासदांना दिला.आजवर केलेल्या आंदोलनाचा काय उपयोग झाला हे मागे वळून बघा.` तत्पुर्वी माळेगावचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष राजेंद्र ढवाण यांनी मागील पाच वर्षांचा कारखान्याचा कारभार उपस्थितींपुढे मांडला. आभार मदनराव देवकाते यांनी मानले.

पवारांचे लक्षवेधी ठरलेले मुद्दे...

माॅलेसेस वरील २८ टक्के कर ५ टक्क्यांवर खाली आणण्यात यश, एआय तंत्रज्ञानसाठी पुरवणी मागणीत आखणी अर्थिक तरतूद करणार, उसाचे क्षेत्र बारामतीच्या जीरायत भागात दिसण्यासाठी कऱ्हा व नीरा जोड प्रकल्प कोणत्याही स्थितीत यशस्वी करणार, माळेगाव देणार जुलै मध्ये खोडकी २०० रुपये पमेंट, माळेगावच्या साखर कामगारांना त्रिपक्षीय समिती सुचवेत तेवढी वेतन वाढ देणार, जुन-जुलैपर्यंत नीरा डावा कॅनाॅल बंद करणार नाही.

पशुवैद्यकिय महाविद्याय व जानाईसिरसाई योजनेसाठी १०० दिवसात एक हजार कोटी रुपये बारामतीला आणणारा एकमेव आमदार आदी मुद्यांच्या आधारे पवारांनी माळेगावकरांना आपलेसे केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com