

Pune News
esakal
पुणे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहनधारकांचे आर्थिक गणित पुन्हा एकदा विस्कटू लागले आहे. मे महिन्यात अवघ्या नऊ दिवसांच्या कालावधीत इंधन दरात झालेल्या सलग वाढीमुळे नागरिकांच्या मासिक खर्चात वाढ झाली आहे.
शनिवारी पेट्रोल आणि पॉवर पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९० पैशांची, तर डिझेलच्या दरात ९५ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी १५ आणि १९ मे रोजीही दरवाढ करण्यात आली होती. त्यामुळे केवळ आठ दिवसांच्या कालावधीत इंधन दरात तिसऱ्यांदा बदल झाला आहे. या तीन टप्प्यांतील वाढीमुळे प्रतिलिटर इंधनाच्या किमतीत जवळपास पाच रुपयांची भर पडली आहे.