
विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला.
महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणार १,१२१ व्हेंटिलेटर्स; प्रकाश जावडेकर यांची माहिती
पुणे : केंद्राडून महाराष्ट्रासाठी येत्या तीन-चार दिवसांत 1,121 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत. यांपैकी 165 व्हेंटिलेटर्स पुणे जिल्ह्यासाठी असतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात केंद्रीय मंत्री जावडेकर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेतला.
कोरोनाग्रस्त पतीचा घरातच मृत्यू; बेशुध्द पत्नीसाठी 3 तासांनी आली अॅम्ब्युलन्स
या बैठकीनंतर जावडेकर म्हणाले, "कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून ज्या उपाययोजना करण्यात येत आहेत, त्याचं सर्वांनी पालन केलं पाहिजे. पुणेकरांनी आजच्या लॉकडाउनला जनता कर्फ्यूप्रमाणे स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला, त्याबद्दल पुणेकरांचे कौतुक केलं पाहिजे. राज्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारमधील संबंधित विभागाशी चर्चा करून राज्यासाठी व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यांपैकी गुजरातमधून सातशे आणि आंध्र प्रदेशमधून 421 व्हेंटिलेटर्स उपलब्ध होणार आहेत"
मोहोळ माफी मागा; एका ट्विटनंतर पुणेकर महापौरांवर भडकले
राज्यात ऑक्सिजनचाही पुरेसा पुरवठा करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्या आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी जे मनुष्यबळ लागणार आहे, त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य मिशन यांच्यामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोनाचा संसर्ग हे राष्ट्रीय संकट आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यात 30 पथकं पाठविण्यात आली आहेत. या पथकांच्या निरीक्षणानंतर आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.
राज्यात लसींचा पुरेसा साठा
राज्याला शुक्रवारी सायंकाळपर्यंत १ कोटी 10 लाख डोस उपलब्ध झाले. तसेच राज्यात सध्या 15 लाख 63 हजार लसींचे डोस शिल्लक आहेत. याचं वितरण योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे. सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्याची वेळ नाही, असंही जावडेकर यावेळी म्हणाले.
Web Title: Maharashtra Get 1121 Ventilators Central Government Pune District Will Get 165
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..