esakal | कोरोनाचे डॉक्‍युमेंटेशनसाठी अभ्यास गट नेमणार, राज्य सरकारचा निर्णय 
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackaray

कोरोनाबाबत करण्यात आलेले सर्व उपाययोजनांचे प्रभावी डॉक्‍युमेंटेशन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

कोरोनाचे डॉक्‍युमेंटेशनसाठी अभ्यास गट नेमणार, राज्य सरकारचा निर्णय 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे, ता. 23 : राज्यात यापूर्वी होऊन गेलेल्या साथीच्या रोगांचे नियंत्रण कशा प्रकारे करण्यात आले होते, याबाबतची माहिती उपलब्ध नाही. ती उपलब्ध असती तर आणखी प्रभावीपणे कोरोना विरोधात लढा देता आला असता, त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची साथ आल्यास त्याचे प्रभावी नियंत्रण क रता यावे, यासाठी कोरोनाबाबत करण्यात आलेले सर्व उपाययोजनांचे प्रभावी डॉक्‍युमेंटेशन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी एक अभ्यास गटाची नियुक्ती आली आहे. 

अभ्यासक्रम बदलल्यानंतर प्राध्यापकांना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाते, पण...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध उपाययोजना करण्यासंदर्भात आजपर्यंत विविध आदेश देण्यात आले आहेत. त्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून राज्यामध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तसेच वेळोवेळी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. अद्यापही हा लॉकडाऊन काही प्रमाणात सुरू ठेवण्यात आला आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीतच कोरोना विषाणूशी लढा देण्याबाबत तसेच त्याचे नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय यंत्रणांनीही विविध प्रकारच्या नाविण्यपूर्ण उपाययोजनाही केल्या आहेत.

विद्येचं माहेरघर विद्यार्थ्यांशिवाय सुनं, कोरोनाचा असा बसणार फटका

कोरोना साथीचा रोगावर इतर देशांकडून करण्यात येत असलेल्या उपचारांच्या अनुभवावरून निर्णय घ्यावे लागलेले आहेत. कारण यापूर्वी होऊन गेलेल्या साथीच्या रोगांचे नियंत्रण कशा प्रकारे करण्यात आलेले होते. त्याची माहिती उपलब्ध नाही. यापार्श्‍वभूमीवर भविष्यात अशा प्रकारचे साथीचे रोग आल्यास त्याचे प्रभावी नियंत्रण करण्याच्या अनुषंगाने कोरोना बाबत करण्यात आलेले सर्व उपाययोजनांचे डॉक्‍युमेंटेशन करण्याचा करण्यासंदर्भातील आदेश घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सर्व डॉक्‍युमेंटेशनची जबाबदारी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. एमएसआरडीसीने एक अभ्यास गट तयार करून राज्यातील विविध प्रशासकीय विभागांना आणि क्षेत्रीय कार्यालयांना भेटी देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. तेथील उपलब्ध अभिलेख यांचा अभ्यास करून करोनाशी लढा याबाबतची व्यवस्थितपणे मांडणी करून त्याचे डॉक्‍युमेंटेशन करावे, अशा सूचना राज्य शासनाचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांनी दिल्या आहेत. 

loading image
go to top