esakal | अभ्यासक्रम बदलल्यानंतर प्राध्यापकांना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाते, पण....
sakal

बोलून बातमी शोधा

University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल केला; पण यात मानवविज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी प्राध्यापकांची कार्यशाळा घेतलेली नाही. तर, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेने ऑनलाइन कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. 

अभ्यासक्रम बदलल्यानंतर प्राध्यापकांना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाते, पण....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात बदल केला; पण यात मानवविज्ञान विद्याशाखेतील अभ्यासक्रमांची माहिती देण्यासाठी प्राध्यापकांची कार्यशाळा घेतलेली नाही. तर, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेने ऑनलाइन कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विद्यापीठाच्या विद्या परिषदेने गेल्या महिन्यात पदवी व पदव्युत्तरच्या द्वितीय वर्षाच्या बदललेल्या अभ्यासक्रमास मान्यता दिली. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षापासून तो लागू होईल. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासह प्रत्यक्षात कामाचा अनुभव मिळावा, रोजगारक्षम व नावीन्यपूर्ण गोष्टी करता याव्यात, असे शिक्षण दिले जाईल. अभ्यासक्रम बदलल्यानंतर प्राध्यापकांना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली जाते.

पुण्यातला रेडलाईट एरिया कोरोनापासून कसा वाचला?

एक ऑगस्टपासून द्वितीय वर्षाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन व ऑफलाइन सुरू होणार आहे, त्यापूर्वी प्राध्यापकांना प्रशिक्षणाचे धडे मिळणे गरजेचे आहे. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यात ९५० पेक्षा जास्त महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न आहेत. यातील अनेक महाविद्यालये ग्रामीण भागात, तसेच पारंपरिक अभ्यासक्रमाचे शिक्षण देणारी आहेत, त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे प्राध्यापकांनी ‘सकाळ’ला सांगितले. याबाबत माहिती घेतली असता, विज्ञान तंत्रज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापनाने प्रशिक्षण सुरू केले आहे. 

धक्कादायक, दौंडमधील डाॅक्टर दांपत्याला कोरोनाची बाधा, 58 जणांना...

प्रॅक्‍टिकलचे प्रशिक्षण अशक्‍य 
विज्ञान शाखेत प्रॅक्‍टिकलही महत्त्वाचे आहे; पण हा भाग केवळ २० टक्‍क्‍यांचा आहे. कोरोनामुळे हे प्रशिक्षण देणे शक्‍य नाही, परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येणार आहे. दरम्यान, सध्याच्या ऑनलाइन प्रशिक्षणवर्गाला प्राध्यापकांची उपस्थिती जास्त आहे, असे चासकर यांनी सांगितले.

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

कार्यशाळेचा उद्देश -
नवीन अभ्यासक्रमाची माहिती देणे
त्याचे फायदे सांगणे
शिकविण्यासाठीच्या नव्या पद्धतीचा अवलंब
तज्ज्ञांकडून मार्गदर्शन 
संदर्भ पुस्तकांचा वापर

मार्चमध्ये एक प्रशिक्षण वर्ग झाला. मात्र, नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणवर्ग सुरू झालेले नाहीत. लॉकडाउनमुळे प्रवास करता येत नाही, त्यामुळे भविष्यात ऑनलाइन प्रशिक्षणाचे नियोजन करावे लागेल.
- डॉ. अंजली कुरणे, अधिष्ठाता, मानवविज्ञान

वाणिज्य शाखेतील बीबीए, बीकॉमचे प्रशिक्षणवर्ग झाले आहेत. जूनच्या शेवटपर्यंत एमबीएसह इतर सर्व कोर्सचे ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण होईल. नवीन अभ्यासक्रमाची माहिती देण्यासह संबंधित विषयातील तज्ज्ञांसोबत संवादही होत आहे.
- डॉ. पराग काळकर, अधिष्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन

अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्‍चरसह इतर कोर्सचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे. विद्यापीठ, महाविद्यालयांच्या संयुक्तपणे ७ ते ८ कार्यशाळा झाल्या आहेत. पुढचे नियोजनही सुरू आहे.
- डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान तंत्रज्ञान

loading image
go to top