esakal | स्टार्टअपसाठी महाराष्ट्र ग्रॅन्ड चॅलेंज स्पर्धा | Pune
sakal

बोलून बातमी शोधा

pune

स्टार्टअपसाठी महाराष्ट्र ग्रॅन्ड चॅलेंज स्पर्धा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील नावीन्यपूर्ण स्टार्टअप्ससाठी महाराष्ट्र ग्रॅन्ड चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने महाराष्ट्र इनोव्हेशनतर्फे आयोजित या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत मंगळवार (ता. १२) पर्यंत आहे. नागरी समस्यांवर शाश्वत आणि परवडणाऱ्या उपाययोजना शोधणाऱ्या अभिनव स्टार्टअप्ससाठी ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सोसायटीच्या वतीने चार समस्यांसाठी स्टार्टअप्सकडून निराकरण प्रारूप मागविण्यात आले आहे. ज्यामध्ये पाच लाखापासून ते एक कोटी पर्यंत बक्षीसाची रक्कम निर्धारित करण्यात आली आहे. अर्ज प्राप्त स्टार्टअप्सची आठ ते ११ नोव्हेंबर दरम्यान चाचपणी होईल. त्यानंतर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात विजेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Exam Form : 'फॉर्म नंबर १७' अर्ज भरण्यास २७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पात्रता -

राज्यासह परदेशातील व्यक्ती, संस्था, संघटना, शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था यात सहभागी होऊ शकते. परदेशी स्टार्टअप्सने किंवा परदेशी नागरिकांचा सहभाग असलेल्या स्टार्टअप्सने भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या नियमांची पुर्तता करणे आवश्यक आहे.

समस्या आणि बक्षिसाची रक्कम -

१) मोठ्या मत्स्यपालन तळ्यांचे स्वयंचलन - बक्षिस ५ लाख, प्रयोगिक प्रकल्पासाठी १५ लाख

२) मत्स्यपालन प्रणाली (आरएएस) आणि बायोफ्लोक (बीएफ) तंत्रज्ञानाची पुनर्रचना - बक्षिस ५ लाख, प्रयोगिक प्रकल्पासाठी १५ लाख

३) नौका बंदर आणि जेटींसाठी अपारंपरिक ऊर्जा - (चार उपप्रकार) बक्षिस ५ लाख, प्रयोगिक प्रकल्पासाठी १५ ते एक कोटी (उपप्रकारानुसार)

४) माशांच्या कचऱ्याचा प्रभावी वापर - बक्षिस ५ लाख, प्रयोगिक प्रकल्पासाठी १५ लाख

अधिक माहितीसाठी किंवा अर्ज करण्यासाठी - https://www.msins.in/public/mh-grand-challenge

loading image
go to top