

Maharashtra MLC Election Update Graduate and Teachers Constituencies Go to Polls Today with 232 Booths in Pune District
sakal
पुणे : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके आवश्यक मतदान साहित्यासह गुरुवारी मतदान केंद्रांकडे रवाना झाली. पुणे जिल्ह्यातील २३२ मतदान केंद्रांवर (शुक्रवार) सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे.