Dattatray Bharane: ऊस गाळप सहा महिने हवे; कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे प्रतिपादन
Sugarcane: कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे म्हणाले की साखर कारखान्याचा गाळप हंगाम सहा महिने सुरू राहावा. शेतकऱ्यांना अधिक भाव देणाऱ्या कारखान्यांना राज्य सरकारचे सहकार्य मिळेल.
पुणे : ‘‘साखर कारखान्याचा गाळप हंगाम सहा महिने सुरू राहिला पाहिजे. मागील दोन-तीन वर्षांची आकडेवारी पाहिली तर तीन ते चार महिन्यांमध्येच गाळप हंगाम संपत आहे. त्याचा फटका कारखानदारांना, शेतकऱ्यांना आणि कामगारांना बसत आहे.