Maharashtra Monsoon : राज्यात सरासरीच्या ८१ टक्के पाऊस मॉन्सूनची आकडेवारी जाहीर; ४२ टक्के क्षेत्रावर अपुरे पर्जन्य

42% of State Area Receives Deficient Rainfall : राज्यातील ४२ टक्के क्षेत्रावर अपुरा पाऊस नोंदला असून, कमी पावसामुळे खरीप आणि रब्बी पिकांच्या स्थितीबाबत चिंता वाढली आहे.
Maharashtra Monsoon

Maharashtra Monsoon

esakal

Updated on: 

पुणे : यंदाच्या जून ते सप्टेंबर या नैऋत्य मॉन्सून हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या ८७ टक्के; तर राज्यात ८१ टक्के पाऊस झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी जाहीर केली. यावर्षीच्या मॉन्सूनवर एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आल्याचे नमूद करतानाच मॉन्सूनोत्तर हंगामात देशाच्या बहुतांश भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यताही ‘आयएमडी’ने वर्तविली आहे.

त्यामुळे खरिपासोबतच रब्बीच्या पिकांबाबतही चिंता वाढली आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. टी. श्रीनिवास कुमार आणि ‘आयएमडी’चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी जून ते सप्टेंबर या नैऋत्य मॉन्सून हंगामाचा अहवाल आणि आगामी ईशान्य मॉन्सून हंगामाचा अंदाज ऑनलाईन स्वरूपात बुधवारी जाहीर केला. ‘आयएमडी’ने हंगामाच्या आधी वर्तविलेल्या अंदाजाप्रमाणे यावर्षी देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे डॉ. श्रीनिवास कुमार यांनी यावेळी सांगितले.

देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेली वर्षे आणि हंगामातील पाऊस (मिमी)

२०१५ ७५८.२

२००२ ६८७.२

२०२६ ७५९.४

२००९ ७०९.१

जिल्हानिहाय स्थिती अतिरिक्त पाऊस (सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के जास्त): पालघर, नाशिक (दोन जिल्हे) सर्वसाधारण पाऊस (सरासरीपेक्षा १९ टक्के कमी- अधिक): ठाणे, मुंबई, मुंबई उपनगरे, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली (१४ जिल्हे) अपुरा पाऊस (सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के कमी): सिंधुदुर्ग, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर (२० जिल्हे) यंदाच्या मॉन्सूनची वैशिष्ट्ये यंदाच्या मॉन्सून हंगामात मॅडन ज्युलियन ऑस्सिलेशन (एमजेओ) हे ढगांचे क्षेत्र भारतीय उपखंडासाठी दीर्घकाळ अनुकूल स्थितीत न आल्यामुळे पावसात मोठे खंड पडले.

एमजेओ भारतासाठी अनुकूल स्थितीत न येणे आणि मॉन्सूनचा प्रवाह दीर्घकाळ क्षीण राहणे हे एल निनोचे थेट परिणाम ठरले. जून ते सप्टेंबर या मॉन्सून हंगामात एकूण १४ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. त्यांपासून एकूण ७७ दिवस पाऊस पडला. मॉन्सून हंगामात सर्वसाधारणपणे १३ कमी दाबाच्या क्षेत्रांपासून ५७ दिवस पाऊस होत असतो.

जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १८ पैकी फक्त पाच आठवड्यांमध्ये सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला. उर्वरित १३ आठवड्यांमध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी राहिला. देशात ७४१ पैकी ३१६ जिल्ह्यांमध्ये अपुरा किंवा अत्यल्प पाऊस नोंदला गेला असून, अशा जिल्ह्यांचे क्षेत्र देशाच्या एकूण क्षेत्राच्या ४३ टक्के आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com