राज्यात दमदार पाऊस 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - बहुतांश ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने राज्यात सरासरी गाठली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही हवामान विभागात दमदार पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. कोकणात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा इशाराही दिला आहे. मराठवाड्यातही तुरळक भागात मुसळधार पाऊस पडेल, असेही सांगण्यात आले. 

राज्यात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) सक्रिय झाला आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासांमध्ये कोकणासह पूर्व विदर्भात जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यात दीड महिन्यांमध्ये पुण्यासह सात जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडला असून मुंबईसह 23 जिल्ह्यांमध्ये पावसाने सरासरी गाठली आहे. राज्यातील चार जिल्हे अद्यापही कोरडे असल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी देण्यात आली. 

कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर येथे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. तर मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सरासरी गाठली. 

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक येथे जोरदार पावसाची नोंद झाली. तर जळगाव, नंदुरबार, धुळे येथे दमदार पाऊस पडला. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुण्यात पावसाने सरासरी ओलांडली, तर नगर, सातारा, कोल्हापूर येथे पावसाने सरासरी गाठली. सांगली येथे मात्र अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. 

यातील परभणीवगळता उस्मानाबाद, बीड, लातूर, जालना, औरंगाबाद, नांदेड, हिंगोली, वाशीम येथे चांगला पाऊस पडला. 

विदर्भातील अकोला आणि अमरावती जिल्ह्यात अद्यापही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, तर बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे सरासरी इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. 

मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापला 
केरळ किनारपट्टीवर 30 मे रोजी दाखल झालेल्या मॉन्सूनने आज सर्व देश व्यापल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. मॉन्सूनने पश्‍चिम राजस्थान, हरियाना आणि पंजाबचा उर्वरित भाग व्यापला. 

Web Title: maharashtra news rain