

Growing Pressure on OBC Hostel Infrastructure; MLA Rahul Kul Raises Issue in Winter Session
Sakal
प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे) : राज्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड व मुंबई येथील ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वसतिगृह क्षमता तात्काळ वाढवा तसेच वसतिगृहाची प्रलंबित कामे पूर्ण करा अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासात केली आहे.यावेळी आमदार कुल म्हणाले की, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई या प्रमुख शैक्षणिक केंद्रांमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना विद्यमान शासकीय वसतिगृहांची क्षमता अपुरी पडत आहे.