Police Name Plate Misuse : 'पोलीस' नावाची लाल पाटी लावणाऱ्या खासगी वाहनांवर थेट कारवाई होणार; राज्यभरात मोहीम राबविण्याचे आदेश

Illegal police name plates : पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच आमदारांच्या खासगी वाहनांवर 'पोलीस' नावाची लाल पाटी लावून तिचा गैरवापर करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे.
Police Name Plate Misuse

Police Name Plate Misuse

esakal

Updated on

Police Name Plate Red Board : राज्यात खासगी वाहनांवर 'पोलीस' अशी लाल रंगाची पाटी लावून त्याचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयाकडून राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना परिपत्रक जारी करण्यात आले आहे. हे परिपत्रक मुख्यमंत्री कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने काढण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com